शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडणार, वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेसेवा लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 1:39 PM

मुंबईतून कोकण रेल्वेमार्गे कोल्हापूरला जाणे आता शक्य होणार आहे. कोकण रेल्वे मार्ग आता पश्चिम रेल्वेशी जोडण्यात येणार आहे.

नवी दिल्ली -  मुंबईतून कोकण रेल्वेमार्गे कोल्हापूरला जाणे आता लवकरच शक्य होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी येथून कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू होणार असून, बऱ्याच वर्षांपासून नियोजित असलेल्या या रेल्वे मार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. कोकण रेल्वेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 103 किमी असेल. तसेच या मार्गावर एकूण 10 स्थानके असतील. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा हा मार्ग प्रत्यक्षात उतरल्यावर कोकणातून कोल्हापूरला जाणे अधिकच सोपे होणार आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

"कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आयोजित कोकण रेल्वे आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . या बैठकीला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 103 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वेबरोबरच या क्षेत्राच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल," असे प्रभू यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी 50 टक्के खर्च भारतीय रेल्वे करणार असून उर्वरित50 टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल आणि एचपीसीएलमार्फत 40 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून महा तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. 2022 सालापर्यंत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गावर कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर या प्रकल्पालाही त्याचा लाभ होणार आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे