कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माणगावजवळ मांडवी एक्स्प्रेस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 13:06 IST2019-03-03T12:58:43+5:302019-03-03T13:06:39+5:30

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक गेल्या एक तासांपासून विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडल्याचे समजते.

Konkan Railway traffic disrupted; Mandvi Express Failure | कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माणगावजवळ मांडवी एक्स्प्रेस बंद

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माणगावजवळ मांडवी एक्स्प्रेस बंद

मुंबई : मांडवी एक्सप्रेस बंद पडल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक गेल्या एक तासांपासून विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील माणगावजळ मांडवी एक्सप्रेस बंद पडली. यामुळे गेल्या एक तासापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. याशिवाय, मांडवी एक्सप्रेस बंद पडल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. 

दरम्यान, मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली आहे, की आणखी काही कारणास्तव माणगावजवळ थांबविण्यात आली आहे, याबाबात अद्याप कोणतीही माहिती कळू शकली नाही.

Web Title: Konkan Railway traffic disrupted; Mandvi Express Failure

टॅग्स :railwayरेल्वे