कोल्हापूर पुन्हा हादरलं; अंगावर गुलाल, कुंकू टाकून ६ वर्षांच्या मुलाचा नरबळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:21 AM2021-10-06T07:21:09+5:302021-10-06T07:21:20+5:30

आरव केसरे हा त्याच्या घराच्या दारात खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले होते. आरवचे वडील राकेश हे हॉटेल कामगार असून, त्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे.

Kolhapur shock again; A 6-year-old boy was killed by throwing gulal and kumkum on his body? | कोल्हापूर पुन्हा हादरलं; अंगावर गुलाल, कुंकू टाकून ६ वर्षांच्या मुलाचा नरबळी?

कोल्हापूर पुन्हा हादरलं; अंगावर गुलाल, कुंकू टाकून ६ वर्षांच्या मुलाचा नरबळी?

googlenewsNext

 मलकापूर (जि. कोल्हापूर) : दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील आरव राकेश केसरे (६) या बालकाचा खून झाल्याचे निष्पन्न समोर आले आहे. मंगळवारी पहाटे आरवचा मृतदेह त्याच्या घराशेजारी आढळून आला. आरवच्या चेहऱ्यावर व अंगावर गुलाल व कुंकू टाकल्याचे आढळून आल्याने नरबळीच्या प्रकारातून खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे; परंतु याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, पोलिसांनी गावातील काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आरव केसरे हा त्याच्या घराच्या दारात खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले होते. आरवचे वडील राकेश हे हॉटेल कामगार असून, त्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे.

पाठीवर गंभीर जखमा
आरवच्या चेहऱ्यावर व अंगावरील कपड्यावर गुलाल, हळद, कुंकू टाकल्याचे व पाठीवर गंभीर जखमांचे व्रण आढळून आले, तसेच त्याचा गळा आवळल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरवची हत्या ही नरबळीसारख्या अघोरी कृत्यातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: Kolhapur shock again; A 6-year-old boy was killed by throwing gulal and kumkum on his body?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.