शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

Kolhapur North By Election Result: ऐतिहासिक निकाल लागणार! उत्तर कोल्हापूरात ५० वर्षांत कधीच घडलं, ते यंदा घडणार; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 12:56 PM

Kolhapur North By Election Result: काँग्रेसच्या जयश्री जाधवांकडे मोठी आघाडी;

कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेणाऱ्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचं मताधिक्य आता १५ हजारांच्या पुढे गेलं आहे. मतमोजणीच्या २२ व्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपचे सत्यजीत कदम यांनी मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्ये अधिक मतं घेतली. आठव्या, नवव्या, दहाव्या फेरीत कदमांना अधिक मतं मिळाली. मात्र त्यानंतरच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये जाधवांनी जास्त मतं घेत आघाडी वाढवत नेली. २२ फेऱ्यांनंतर जाधव यांच्या पारड्यात ८३,३३८ मतं आहेत. तर कदमांना ६७,८१३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेस कोल्हापूर उत्तर राखणार हे स्पष्ट झालं आहे.

पहिल्यांदाच महिला आमदार मिळणारउत्तर कोल्हापूर मतदारसंघानं आतापर्यंत ९ आमदार पाहिले. पैकी दोन जण प्रत्येकी दोनदा निवडून आले. मात्र कोल्हापूर उत्तरमधून एकदाही महिला उमेदवार विजयी झालेली नाही. त्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय ऐतिहासिक असेल. विधानसभेत पहिल्यांदाच उत्तर कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व महिला करताना दिसेल.कोण किती साली जिंकले१९७२ : त्र्यं. सी. कारखानीस(शेकाप)१९७८ : रवींद्र सबनीस (जनता पक्ष)१९८० : लालासाहेब यादव (काँग्रेस)१९८५ : प्रा. एन. डी. पाटील (शेकाप)१९९० : दिलीप देसाई (शिवसेना)१९९५ : सुरेश साळोखे (शिवसेना)१९९९ : सुरेश साळोखे (शिवसेना)२००४ : मालोजीराजे छत्रपती (काँग्रेस)२००९ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)२०१४ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)२०१९ : चंद्रकांत जाधव (काँग्रेस)

क्षीरसागरांची नाराजी दूर करण्यात यशकोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेला पाचवेळा यश मिळालं आहे. २००९ ते २०१९ या कालावधीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. मात्र २०१९ मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. क्षीरसागर निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र २०१९ मध्ये इथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्यानं या मतदारसंघात काँग्रेसनंच उमेदवार दिला. क्षीरसागर आणि शिवसैनिकांची नाराजी हा कळीचा मुद्दा होता. मात्र जाधव यांना मिळालेली आघाडी पाहता हा विषय निकाली निघाल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसBJPभाजपा