लोणावळ्यात पिस्टल व जिवंत काडतुसासह एक जणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 21:40 IST2017-10-03T18:54:55+5:302017-10-03T21:40:23+5:30

लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चारचाकी गाडीतून पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह आलेल्या एका 29 वर्षीय परप्रांतीयाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अटक केली.

Know the Top 5 News in Today's Day | लोणावळ्यात पिस्टल व जिवंत काडतुसासह एक जणाला अटक

लोणावळ्यात पिस्टल व जिवंत काडतुसासह एक जणाला अटक

लोणावळा - लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चारचाकी गाडीतून पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह आलेल्या एका 29 वर्षीय परप्रांतीयाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अटक केली.
 नवरात्र व मोहरम सणाच्या निमित्त पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील गुन्हेगार व अवैध हत्यारे बाळगणारे इसम यांची चाचपणी सुरु असताना कार्ला फाटा येथे एक व्यक्ती पिस्टल घेऊन येणार असल्याची खबर गुन्हे अन्वेषण पथकाने पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, सहाय्यक फौजदार विजय पाटील, किरण आरुटे, दत्ता बनसोडे, विशाल साळुंखे, दत्ता जगताप यांनी वेशांतर करुन कार्ला फाटा येथे सापळा रचत कार्ला पाटण रोड येथे राहणारा मुळचा बिहार राज्यातील एका व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Know the Top 5 News in Today's Day