…अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 13:05 IST2020-02-04T13:05:34+5:302020-02-04T13:05:49+5:30
शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या
मुंबई : 'मुंबई प्राइड सॉलिडेटरी गॅदरींग २०२०'मध्ये जेएनयूचा विद्यार्थी नेता शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे शर्जील इमाम समर्थकांना अटक केली नाही तर गुरुवार पासून पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
मुंबईतील आझाद मैदानात मुंबई प्राइड सॉलिडेटरी गॅदरींग २०२०चं १ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही लोकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रक्षोभक भाषण करणाऱ्या शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
तर आझाद मैदानात देश विरोधात निदर्शने करणाऱ्या शर्जील इमामच्या समर्थकांनी "शर्जील तेरे सपनोका भारत बनायेंगे हम" अशा घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे अशा घोषणा देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच इमामच्या समर्थकांना अटक केली नाही तर, आझाद पोलीस स्टेशन समोर गुरुवारपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा सोमय्या यांनी दिला आहे.
मुंबई पोलिसांनी आझाद मैदान येथे 1 फेब्रवारी ला देश विरोधी निदर्शनं आणि घोषणा करणाऱ्या " शर्जील तेरे सपनोका भारत बनायेंगे हम" अशा शर्जील इमाम समर्थकांना अटक केली नाही तर गुरुवार पासून मी आझाद मैदान पोलिस स्टेशन येथे बेमुद्दत धरणे आंदोलन शुरू करणार @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 3, 2020