Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून कऱ्हाडमध्ये उतरवलं, साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 08:25 AM2021-09-20T08:25:56+5:302021-09-20T08:27:04+5:30

Kirit Somaiya : हसन मुश्रीफांविरोधात आक्रमक झालेले किरीट सोमय्या पोलिसांच्या विनंतीनंतर माघारी परतणार?

Kirit Somaiya was dropped off by the police at Karhad, a press conference will be held at 9.30 am | Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून कऱ्हाडमध्ये उतरवलं, साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून कऱ्हाडमध्ये उतरवलं, साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद

googlenewsNext

कऱ्हाड : कोल्हापूरकडे रवाना झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या BJP leader kirit somaiya) यांना कऱ्हाडमध्ये उतरवण्यात आले. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणे पाच वाजता किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कऱ्हाड येथे उतरले आहेत. 

प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच, किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट सुद्धा केले आहे. आज सोमवारी सकाळी नऊ वाजता कराड मधील शासकीय विश्रामधाम येथे त्यांची पत्रकार परिषद आहे. तिथे ते काय बोलतात याबद्धल उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. तसेच, किरीट सोमय्या हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यातील कापशी खोऱ्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची चौकशी करण्यासाठी कोल्हापूरला येणार होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाबंदी केली. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना कऱ्हाडमध्ये उतरवण्यात आले.

जिल्हाबंदीचे आदेश
कोल्हापुर जिल्ह्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 20 सप्टेंबरला पहाटे 5 ते 21 सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. किरीट सोमय्यांना सुद्धा याबद्दल नोटीस बजावली. 
 

Web Title: Kirit Somaiya was dropped off by the police at Karhad, a press conference will be held at 9.30 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.