किरीट सोमय्या स्टंटबाज, तो शक्ती कपूरसारखा मिरवतो; चंद्रकांत खैरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 14:24 IST2022-04-24T14:23:17+5:302022-04-24T14:24:06+5:30

किरीट सोमय्या यांच्यावर काल रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली.

Kirit Somaiya stuntman he walks like Shakti Kapoor says Chandrakant Khaire | किरीट सोमय्या स्टंटबाज, तो शक्ती कपूरसारखा मिरवतो; चंद्रकांत खैरेंचा टोला

किरीट सोमय्या स्टंटबाज, तो शक्ती कपूरसारखा मिरवतो; चंद्रकांत खैरेंचा टोला

औरंगाबाद-

किरीट सोमय्या यांच्यावर काल रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली. किरीट सोमय्याला खूप खाज आहे. त्यानं तिथं जायची गरजच काय होती. हा फक्त स्टंटबाजी करतो. शक्ती कपूरसारखा मिरवत फिरतो, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. मुंबईत राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी खार पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांच्या रोषाला सोमय्यांना सामोरं जावं लागलं होतं. सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पल फेक करण्यात आली. यात सोमय्यांच्या कारची काच फुटली आणि त्यांची हनुवटी रक्तबंबाळ झाली. सोमय्यांनी या हल्ल्याबाबत ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. 

ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड हल्ला होता आणि माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव सरकारचा आहे, असा आरोप सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. सोमय्या प्रकरणावर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी सोमय्यांचा एकेरी उल्लेख करत खरमरीत टीका केली. "सोमय्याला किती खाज आहे. तो कशाला गेला तिथं. तिथे गेल्यावर मार खाणारच ना. त्याने मुद्दामहून प्रसिद्धीसाठी स्टंट केला. सोमय्या शक्ती कपूरसारखा आहे हे मी याआधीही लोकसभेत म्हटलं होतं. तो फक्त बडबड करतो. त्याशिवाय दुसरं काही  करत नाही. राष्ट्रपटी राजवट लावणं काही मी येणार-मी येणार म्हणण्यासारखं सोपं काम नाही", असा टोला खैरे यांनी लगावला. 

Web Title: Kirit Somaiya stuntman he walks like Shakti Kapoor says Chandrakant Khaire