kirit somaiya claims that thackeray govt hide corona deaths in the state | “कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

ठळक मुद्देभाजपचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोपवसई-विरार भागात कोरोना मृतांच्या आकडेवारी गोंधळपालिकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

मुंबई: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्रात सर्वाधिक लागण झालेले रुग्ण असल्याचे गेल्या काही सलग दिवसांपासून दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. (kirit somaiya claims that thackeray govt hide corona deaths in the state)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारकडून कोरोना मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. 

 ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या पॅकेजमधील फरक आणि साम्य काय? पाहा, डिटेल्स

पालिकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

१ ते १३ एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करू, असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ठाण्यात स्मशानभूमींमध्ये ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात ५७ करोना मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे, असा दावाही सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमधून केला आहे. 

वसई-विरार भागात आकडेवारी गोंधळ

जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे २९५ जणांचा बळी गेला असताना पालिकेने केवळ ५२ मृत्यूंची नोंद केली. म्हणजेच या वर्षात आतापर्यंत पालिकेने २४३ करोनाबळी लपवल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगितले जात आहे. यावर, शहरातील खासगी रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद पालिकेच्या दैनंदिन अहवालात केली जात नव्हती. या अहवालात केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद होते. मात्र, यापुढे खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही अहवालात करण्यात येईल, असे स्पष्टीकरण वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी दिली आहे.

...म्हणून सचिन वाझे करणार होते दोघांचा एन्काउंटर?; वेगळाच प्लॅन समोर आल्यानं नवा ट्विस्ट

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kirit somaiya claims that thackeray govt hide corona deaths in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.