शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

रक्तगट वेगळे असूनही झाले किडनी प्रत्यारोपण

By admin | Updated: March 14, 2015 05:44 IST

एकच रक्तगट असल्यास किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. पण, रक्तगट वेगळे असतानाही केलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मुंबई : एकच रक्तगट असल्यास किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. पण, रक्तगट वेगळे असतानाही केलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते. ग्लायकोसॉर्ब तंत्रज्ञानात किडनी लाभार्थ्याचे रक्त फिल्टर करून प्लाझ्मामधील अ‍ॅण्टीबॉडीज् कमी केल्या जातात. यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे शरीर किडनीला स्वीकारते. ओमप्रकाश शर्मा यांच्या पत्नीची सुमन शर्मा यांची किडनी ग्लायकोसॉर्ब तंत्रज्ञान वापरून देण्यात आली आहे.ओमप्रकाश शर्मा यांना एप्रिल २०१३ साली किडनीचा त्रास सुरू झाला होता. सायंकाळी त्यांना थोडा थोडा ताप यायचा. तपासण्या केल्यावर काहीही आढळले नाही. त्यानंतर रुग्णालयात जाऊन तपासण्या केल्या. नेफ्रॉलॉजिस्टकडून औषध घेतल्यावर थोडे बरे वाटले. परदेशात जाऊन आलो. नोव्हेंबर २०१३मध्ये परत त्रास जाणवू लागला. रुग्णालयात दाखल झालो. पण काही दिवासांनी तपासण्या केल्यावर कळले की किडनीचा आजार वाढला आहे. यामुळे डायलेसिस अथवा किडनी प्रत्यारोपण असे दोनच पर्याय होते. पण, माझा रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’ आहे, आणि घरातल्या सर्वांचा ‘ए पॉझिटिव्ह’ आहे. मग, प्रतीक्षा यादीत नाव घातले. तेव्हा ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांना भेटलो. त्यांनी ग्लोयकोसॉर्बचा पर्याय सुचवला. २४ डिसेंबर २०१४ रोजी माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता मी पुन्हा नोकरीला जातो, असे ओमप्रकाश यांनी सांगितले. प्रत्यारोपण करताना प्रामुख्याने रक्तगट तपासला जातो. कारण, रक्तगट वेगळा असल्यास रक्तातील अ‍ॅण्टीबॉडीज् प्रत्यारोपण केलेली किडनी स्वीकारत नाहीत. सुमन व ओमप्रकाश यांचा रक्तगट वेगळा होता. तेव्हा ग्लायकोसॉर्ब तंत्रज्ञान वापरले. ओमप्रकाश यांच्या अ‍ॅण्टीबॉडीज् वाढल्या नाहीत. यामुळे त्यांच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आहे. आता त्या दोघांची प्रकृती उत्तम आहे, असे ग्लोबल रुग्णालयाचे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. भरत शहा यांनी सांगितले.