शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

खेरवाडी उड्डाणपूल, पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता उद्यापासून खुला

By admin | Updated: June 15, 2014 02:23 IST

वाहतुकीच्या कोंडीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांसाठी एक खूशखबर आहे. पश्चिम उपनगरातील खेरवाडी येथील उड्डाणपूल व पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता लवकरच खुला होणार आहे

मुंबई : वाहतुकीच्या कोंडीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांसाठी एक खूशखबर आहे. पश्चिम उपनगरातील खेरवाडी येथील उड्डाणपूल व पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता लवकरच खुला होणार आहे. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. खेरवाडी उड्डाणपुलामुळे आता दहिसरपासून थेट वरळीपर्यंत सिग्नलविरहित प्रवास करता येईल; तर जोडरस्त्यामुळे दक्षिण मुंबईपासून पूर्व उपनगरामध्ये अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे. खेरवाडी उड्डाणपुलाचे अंतर ५८० मीटर असून, दक्षिणेकडील बाजूवर ३ मार्गिका आहेत. त्यामुळे खेरवाडी जंक्शनजवळ होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा एमएमआरडीएतर्फे करण्यात आला आहे.पूर्व मुक्त मार्गावरील पांजरपोळ- घाटकोपर जोडरस्त्याची लांबी २.८० किलोमीटर इतकी असून, हे काम पूर्ण झाल्याने १६.४ किलोमीटर मार्गाचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुुळे आता दक्षिण मुंबईतून पूर्व उपनगरापर्यंत एकाही सिग्नलशिवाय ३० मिनिटांमध्ये पोहोचता येऊ शकेल. खेरवाडी उड्डाणपुलाचे उद्घाटन सोमवारी दुपारी ३ वाजता तर पांजरपोळ-घाटकोपर लिंकरोडचे उद्घाटन साडे तीन वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)