काशीरामच्या हत्येचे खैरलांजी कनेक्शन

By Admin | Updated: May 25, 2014 05:44 IST2014-05-25T05:44:19+5:302014-05-25T05:44:19+5:30

देव्हाडी येथील काशीराम कुकडे याचा खून करण्यासाठी वापरलेले टिकास आणि फावडे तुमसर पोलिसांनी शनिवारी सकाळी काशीरामचा मेहुणा संजय पंचबुद्धे याच्या खैरलांजी येथील घरून जप्त केले.

Khairangi connection of Kasiram murder case | काशीरामच्या हत्येचे खैरलांजी कनेक्शन

काशीरामच्या हत्येचे खैरलांजी कनेक्शन

तुमसर (जि.भंडारा) : देव्हाडी येथील काशीराम कुकडे याचा खून करण्यासाठी वापरलेले टिकास आणि फावडे तुमसर पोलिसांनी शनिवारी सकाळी काशीरामचा मेहुणा संजय पंचबुद्धे याच्या खैरलांजी येथील घरून जप्त केले. फेब्रुवारी २०१३मध्ये काशीराम कुकडेचा पत्नी शीला, मुलगा संतोष आणि मेहुणा संजय पंचबुद्धे या तिघांनी मिळून फावड्याने खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी या तिघांनीही घरातच खड्डा खोदून मृतदेह पुरला. पाच महिन्यांनंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढून हाडे तलावात फेकून दिली. दरम्यान, हे घर खचले. खचलेल्या घरातून मोकाट कुत्र्यांनी कपडे व अन्य साहित्य बाहेर आणले. गावकर्‍यांनी घरात डोकावून पाहिले असता त्यांना खड्डा दिसला. पोलिसात तक्रार झाली. पोलिसांनी खड्डा खोदला. त्यात मानवी हाडे निघाली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी काशीरामची पत्नी शीलाचा शोध घेऊन तिला रायपूरहून ताब्यात घेतले. २४ तासांनंतर तिने खुनाची कबुली दिली आणि या प्रकरणातील सत्य उघडकीस आले. आरोपींच्या जबाबानंतर त्यांनी दाखविलेल्या ठिकाणी देव्हाडी गाव तलावातून पोलिसांनी विखुरलेल्या स्थितीतील हाडे हस्तगत केली. या प्रकरणात तुमसर पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, तुमसर न्यायालयाने त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Khairangi connection of Kasiram murder case