शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आज केडीएमसी महापौरपदाची निवडणूक

By admin | Updated: November 11, 2015 02:33 IST

कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक उद्या (बुधवारी) होत असून शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपाच्या विक्रांत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक उद्या (बुधवारी) होत असून शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपाच्या विक्रांत तरे अथवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होणे अपेक्षित आहे.महापौर व उपमहापौरपदाकरिता शिवसेना आणि भाजपाकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन बहुमताच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा युतीचा प्रयत्न असणार आहे. शिवसेना व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेला प्रथम महापौरपद देऊन भाजपाने उपमहापौरपद स्वीकारण्याचा निर्णय झालेला आहे. केडीएमसीच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत शिवसेना- भाजपा हे राज्यातील सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. ५२ जागांवर विजय मिळवून शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला तर त्याखालोखाल ४२ जागा मिळवणारा भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. दोन्ही पक्ष आपापले महापौर बसवण्याकरिता रस्सीखेच करतील, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेतील घोडेबाजार रोखण्याकरिता त्यांनी युतीचा निर्णय घेतल्याने ९ जागा मिळवणाऱ्या मनसेचे किंगमेकर होण्याचे स्वप्न हवेत विरले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे ६, बसपाचा १ आणि ९ अपक्ष यांचेही सत्तेच्या वाट्याचे इरादे गारद झाले.महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करताना शिवसेना आणि भाजपाकडून अगोदर स्वतंत्र अर्ज दाखल झाले व नंतर युतीची घोषणा झाली. वाटाघाटीत पहिले महापौरपद शिवसेनेला मिळणार असल्याने राजेंद्र देवळेकर यांचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपातर्फे महापौरपदाकरिता अर्ज दाखल करणारे राहुल दामले हे अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. भाजपाकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे विक्रांत तरे आणि विशाल पावशे यांच्यापैकी कोणाच्या गळात माळ पडते ते पाहणे औत्सुक्याचे आहे. (प्रतिनिधी)ठाकरे येणार दुर्गादेवीच्या दर्शनालाकेडीएमसीत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यास मी स्वत: दुर्गाडी देवीच्या दर्शनाला येईन, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कल्याणकरांना दिला होता. त्याप्रमाणे बुधवारी महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ते स्वत: जातीने उपस्थित राहणार असून, निकालानंतर नवनिर्वाचित महापौरांसोबत दुगार्डी येथे जाऊन दुर्गा देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर ते डोंबिवलीतील आप्पा दातार चौकातील गणेशमंदिरात जाऊन गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.