शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:31 IST

महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते.

डहाणू- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांड प्रचंड गाजले. या घटनेवरून भाजपाने राज्यभरात रान उठवले होते. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याची सुरुवात याच घटनेपासून सुरू झाली होती. या घटनेत भाजपाने ज्यांच्यावर गंभीर आरोप केलेत, त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ चौधरी यांना मोठ्या दिमाखात भाजपाने प्रवेश दिला आहे. डहाणूत भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र आलेले असताना भाजपाने काशिनाथ चौधरींचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. मात्र या पक्षप्रवेशावरून भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

डहाणूत शिंदेसेना, अजित पवार गट, उद्धवसेना, शरद पवार गट एकीकडे भाजपाविरोधात एकत्र आलेले आहेत. त्यातच दुसरीकडे शरद पवार गटाचे काशिनाश चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत डहाणू तालुक्यातील कासा, सायवन, कळमादेवी, मोडगाव, खुबाले, रायपूर, उधवा, हळदपाडा यासह शेजारील तलासरीचे तालुकाध्यक्ष संजू वराठा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे खासदार डॉ. हेमंत सावरा, आ.हरिशचंद्र भोये, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह इतर नेते होते.

काय आहे पालघर साधू हत्याकांड?

महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते. लॉकडाऊन काळात पालघर जिल्ह्यात साधू चिनमयानंद आणि सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळात ही घटना घडल्याने भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरले होते. या घटनेतील मुख्य सूत्रधार काशिनाथ चौधरी आहेत असा आरोप भाजपाने केला होता. मात्र याच काशिनाथ चौधरींना भाजपाने पक्षप्रवेश दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

१६ एप्रिल २०२० रोजी घडलेल्या या घटनेत भाजपा नेत्यांनी चौधरी यांना प्रमुख दोषी ठरवले होते. एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारविरोधात जे बंड केले त्याचे हे प्रमुख कारण सांगण्यात आले. जमावाच्या हल्ल्यात २ साधू आणि एका वाहन चालकाची हत्या झाली होती. त्यात पोलिसांनी २०० लोकांना ताब्यात घेतले, १०८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. काशिनाथ चौधरी त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते, तेव्हा भाजपाने या घटनेमागील मुख्य सूत्रधार तेच असल्याचा आरोप केला होता. मात्र आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर चौधरी यांना भाजपाने पक्षात घेत कमळ हाती दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपावर तोंडसुख घेतले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP inducts Palghar murder accused, sparking controversy and questions.

Web Summary : BJP welcomed Kashinath Choudhary, previously accused in the Palghar साधू murder case, raising eyebrows. Despite past accusations and opposition unity, BJP's move faces criticism ahead of local elections.
टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे