कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: June 4, 2025 23:44 IST2025-06-04T23:43:23+5:302025-06-04T23:44:16+5:30

खाेदलेल्या साईडपट्टीच्या अरुंद रस्त्यावर कराड-लातूर एसटी बस उलटली

Karad-Latur ST bus overturns, 17 passengers injured; 53 people safe, incident on Latur-Murud route | कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना

कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना

राजकुमार जाेंधळे

लातूर - सातारा जिल्ह्यातील कराड स्थानकातून सकाळी १०.४५ वाजता लातूरकडे मार्गस्थ झालेली बस लातूरनजीक रामेगाव पाटी येथे बुधवारी रात्री ८ वाजता उलटली. या अपघातात बसमधील ७० प्रवाशांपैकी १७ प्रवासी जखमी झाले असून, ५३ जण सुखरुप आहेत. खाेदलेल्या साईडपट्टीमुळे अरुंद रस्त्यावर निसरड्या ठिकाणावरुन बस अलगद उलटल्याने बहुतेकांना इजा झाली नाही.

घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकेतून लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लातूर-बार्शी महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. तेथून लातूर अवघ्या १५ किलाेमीटर अंतरावर असताना रस्त्यालगतच्या खाेदकामाचा अंदाज अनेक वाहनांना येत नाही. शिवाय, रस्त्यालगत दिशादर्शक फलक, चिन्हेही ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बसचालकाला अंदाज न आल्याने बस अचानक उलटली. बसचा वेग कमी असल्याने फारशी हानी झाली नाही. रस्त्यावरुन जा-ये करणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने थांबवत घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्रीची वेळ असल्याने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आराडाओरडा सुरु हाेता. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बसचा समाेरील आणि पाठिमागील काच फाेडून आत प्रवेश केला आणि एका-एका प्रवशांना बाहेर काढले.

दाेन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल...
बस उलटल्यानंतर काहींनी बसमधील प्रवशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी रुग्णवाहिकेला घटनास्थळी बाेलावण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळात दाेन रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाल्या. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले. १७ जखमींची नावे आणि ओळख पटविण्याचे काम रुग्णालयात सुरु हाेते.

बसचा वेग कमीच हाेता...
लातूर-बार्शी महामार्गाचे काम सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्याचे खाेदकाम केले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यालगत खाेदकाम केले आहे. याचा अंदाज घेत मी बसचा वेग कमी केला हाेता. मात्र, अंधार असल्याने रस्त्याचा अंदाज आला नाही. शिवाय, रस्त्यालगत दिशादर्शक फलक नसाल्याने बस रस्त्यावरच उलटली. - सदानंद माराेती लाेंढे, बसचालक

बसच्या काचा फाेडून बाहेर काढले...
कराड-लातूर बसमधून मी प्रवास करत हाेते. चालकाच्या पाठीमागेच मी बसले हाेते. दरम्यान, बस उलटल्यानंतर अचानक माेठा आवाल आला. काहीच कळले नाही. मी घाबरुन गेले. नेमके काय झाले आहे, हे काही वेळ समजले नाही. बसमध्ये एकच गाेंधळ, आरडाओराडा सुरु झाला. काहींनी बसच्या काचा फाेडून आम्हाला बाहेर काढले. - पायल कठारे, बसमधील प्रवासी (रा. लातूर)

Web Title: Karad-Latur ST bus overturns, 17 passengers injured; 53 people safe, incident on Latur-Murud route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.