शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कामठीत भोयर यांची माघार

By admin | Updated: October 1, 2014 00:48 IST

कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी मंगळवारी अर्ज

काँग्रेसला समर्थन नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी मंगळवारी अर्ज परत घेतला असून काँग्रेसचे उमेदवार माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना पाठिंबा दिला आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचे भोयर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. सुरेश भोयर यांनी कामठी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला होता. मंगळवारी सकाळी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. तीत अनंतराव घारड, राजेंद्र मुळक, सुरेश भोयर, देवराव रडके आदी उपस्थित होते. या वेळी वासनिक यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा घडवून आणली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भोयर यांना फोन करून काँग्रेसच्या हितासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. नेत्यांच्या विनंतीचा मान ठेवत भोयर यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला व मुळक यांना समर्थन जाहीर केले. आपल्या या निर्णयामुळे कामठी मतदारसंघाला नवी दिशा मिळेल,असा विश्वासही भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.अर्ज परत घेताना भोयर यांच्यासोबत राजेंद्र मुळक, माजी आ. देवराव रडके, जिल्हा परिषद सदस्य बबिता साठवणे, मौदा नगर पंचायत समितीचे अध्यक्ष उमेश गभणे, राजेश निनावे, तुळशीराम काळमेघ, हुकूमचंद आमधरे, प्रसन्ना तिडके, प्रभाकर मोहोड, मुरलीधर भर्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)