शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कल्याणच्या भाजपा नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, वर्तकनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 2:52 PM

भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ व त्यांच्या पतीवर देखील गुन्हा दाखल

ठळक मुद्देकल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखलठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ व त्यांच्या पतीवर देखील गुन्हा

ठाणे, दि. 12 - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दया गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ व त्यांच्या पतीवर देखील इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यास मदत केल्याबद्दल दोघांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  पीडित तरुणीने ठाणे पोलीस आयक्तांकडे लेखी तक्रार केली होती.   लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याचा आरोप ठाण्यातील एका तरुणीने केला आहे. याप्रकरणी तरुणीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे भाजप नगरसेवक वादाच्या भोव:यात सापडले आहे. गायकवाड यांना अन्य दोन जणांनी मदत केल्याचाही उल्लेख तरुणीने तक्रार अर्जात केला होता. दरम्यान नगरसेवकाच्या पत्नीने तरुणीच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. काय म्हटले होते तक्रार करणा-या तरूणीने- तरुणीने केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, तरुणीशी दया गायकवाड सोबत फेसबूकवर ओळख झाली. त्यानंतर ते एका ठिकाणी भेटले. त्यानंतर दया गायकवाडने तिला टिटवाळा व बदलापूर येथे लॉजवर नेऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून दयाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दया व त्याचे अन्य दोन साथीदार तरुणीचा छळ करीत आहे. या प्रकरणी दयासह अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास करण्याचा तक्रार अर्ज तरुणीने केला होता. दरम्यान यासंदर्भात नगरसेवक दया गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधीत तरुणीने फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली होती. तेवढीच तिच्यासोबत माझी ओळख आहे. त्यानंतर तिची आई व तिने माझ्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर मला ती फोन करुन धमाकावत राहिली. या प्रकरणी माझ्या पत्नीने तिच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. तिच्याकडून ब्लॅकमेल सुरु असल्याचा उलट आरोप गायकवाड यांनी केला आहे.  

टॅग्स :BJPभाजपाRapeबलात्कारCrimeगुन्हा