शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जुन्नरच्या प्राध्यापकांनी विकसित केले 'इको फ्रेंडली हॅण्डवॉश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 19:49 IST

मानवी त्वचेला व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचविणारे हॅन्डवॉश विकसित

ठळक मुद्देभारतीय पेटंट झाले फाईल: पीपीई किट मास्कचे संरक्षण करणारे लिक्विड तयारप्राणघातक सूक्ष्मजीवांचा सामना करण्यासाठी नॅनोमटेरियलवर आधारित हँडवॉश उपयुक्त ठरणार

राहुल शिंदे -

पुणे: जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि सी- मेंट संस्थेचे माजी महासंचालक डॉ. दिनेश अंमळनेरकर यांनी सुगंधी वनस्पती व पर्यावरणपूरक घटकांचा वापर करून मानवी त्वचेला व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचविणारे हॅन्डवॉश विकसित केले असून त्याचे पेटेंट फाईल झाले आहे. तसेच पीपीई किट व मास्क यांना विषाणूंपासून वाचविणारे अँटी बॅक्टेरियल ,अँटी व्हायरल लिक्विडही विकसित करण्यात या प्राध्यापकांना यश आले असून त्याचेही पेटेंंट फाईल झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) शिफारस केल्याप्रमाणे सतत स्वच्छ हात धुणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. परंतु, अल्कोहोल आधारित हॅन्डवॉश ज्वलनशील आहेत. तसेच वारंवार वापरामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत. त्याचप्रमाणे विविध रसायनांच्या वापरातून तयार केलेले हँडवॉश पर्यावरणाला आणि पोहोचवू शकते.  त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू आणि इतर प्राणघातक सूक्ष्मजीवांचा सामना करण्यासाठी नॅनोमटेरियलवर आधारित पर्यावरण पूरक आणि बिनविषारी हँडवॉश उपयुक्त ठरणार आहे,  आहे, असा दावा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केला आहे.जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभाग व संशोधन केंद्र आणि सी- मेंट या संशोधन संस्थेचे माजी महासंचालक डॉ.दिनेश अंमळनेरकर यांनी एकत्रितपणे कोरोना विषाणू आणि इतर प्राणघातक सूक्ष्मजीवांचा सामना करण्यासाठी नॅनोमटेरियलवर आधारित बिनविषारी हँडवॉश विकसित केला आहे. डॉ. अंमळनेरकर यांच्यासह महाविद्यालयातील पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभाग व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.रवींद्र चौधरी डॉ. प्रमोद माने यांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे. डॉ. रवींद्र चौधरी म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून सार्स , इबोला आणि झिका यासारख्या विषाणूंचा मानवाला सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील संशोधन केंद्रात विषाणूंना रोखण्यासाठीचे संशोधन केले जात आहे. सध्या वापरल्या जात असलेल्या हँडवॉश आणि साबणामधील विविध रासायनिक द्रव्यांपासून पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. तसेच मानवी त्वचेवरही त्याचे परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सदर हँडवॉश सुगंधी वनस्पती व पर्यावरणाला पूरक असणाऱ्या घटकांपासून विकसित केले आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून वापरल्या जात असलेल्या पीपीई किट व मास्कचे विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी अँटी बॅक्टरियल,अँटी व्हायरल लिक्विड विकसित करण्यात आले आहे. या कामात जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय काळे व श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.आर. मंडलिक यांचे सहकार्य मिळाले.----------------बहुतेक जिवाणू आणि विषाणू विरुद्ध सौम्य सोडियम हायपोक्लोराइड ब्लीच सोल्यूशन स्वस्त असून ते वेगाने काम करते. मात्र, हे त्वचेसाठी हानिकारक आहे. कच्च्या भाज्या, कच्चे समुद्री पदार्थ, आणि फळे , खाद्यपदार्थांवर या जंतुनाशक फॉमुर्लेशनचा वापर केला जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून विकसित केलेले लिक्विड उपयुक्त ठरू शकते.- डॉ दिनेश अंमळनेरकर ,माजी महासंचालक, सी- मेंट

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलResearchसंशोधन