महाराष्ट्र सरकारकडून इस्राईलमध्ये नोकरीची संधी; नियम आणि अटी कोणत्या? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:16 IST2025-01-10T19:11:49+5:302025-01-10T19:16:48+5:30

रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

Job opportunity in Israel from Maharashtra government What are the terms and conditions | महाराष्ट्र सरकारकडून इस्राईलमध्ये नोकरीची संधी; नियम आणि अटी कोणत्या? 

महाराष्ट्र सरकारकडून इस्राईलमध्ये नोकरीची संधी; नियम आणि अटी कोणत्या? 

Maharashtra Government :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक (including OJT) आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिका-यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंग (GDA/ANM/GNM/Bsc Nursing/Post Bsc Nursing) ची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

दरम्यान, या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे.

Web Title: Job opportunity in Israel from Maharashtra government What are the terms and conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.