Jitendra Awhad: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 07:36 IST2026-02-07T07:32:04+5:302026-02-07T07:36:16+5:30
Jitendra Awhad Meet Eknath Shinde: राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Jitendra Awhad: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांबाबत निर्णय व्हावा, यासाठी भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आव्हाड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे प्रचारात व्यग्र असल्याने भेट होऊ शकली नव्हती. निधीअभावामुळे रखडलेल्या कामांबाबत विचारले असता, यापुढे शंभर टक्के ठोस पावली उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला.
अजित पवार यांच्या मृत्यूबाबत खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या शंकांवर ते म्हणाले, संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणी संशय घेईल, कोणी तो खोडून काढेल. राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चेत मला सहभागी करून घेतले नव्हते. त्यामुळे याबाबत मला काही माहिती नाही.