शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'खुनाचा गुन्हा चालला असता; पण माझा जन्म 354-376 साठी नाही झाला', जितेंद्र आव्हाड भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:30 IST

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

मुंबई: मराठी चित्रपट 'हर हर महादेव' याचे शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला, पण आव्हाडांविरोधात एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

'खुनाचा गुन्हा चालला असता, पण...'विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी आव्हाड म्हणाले की, 'माझ्यावरचा गुन्हा हा केवळ षड्यंत्राचाच भाग आहे. 'हर हर महादेव' चित्रपट प्रकरणात मला विनाकारण कोठडीत ठेवलं. कालचाही प्रकार अतिशय चुकीचा आहे. यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं. मी सगळं मान्य करेन पण 354(विनयभंग) आणि 376, यासाठी माझा जन्म झालेला नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण हे मला सहन होत नाही,' असं म्हणत आव्हाड भावूक झाले.

'राजकारणात राहायचं नको'आव्हाड पुढे म्हणाले की, 'ही गोष्ट माझ्या काळजाला लागली आहे. माझ्यावर इतर कोणताही आरोप केला असता तर चालला असता, पण 354 मला मान्यच नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला गेला. मी आयुष्यात असं काही करू शकत नाही. हा मोठ्या कटाचा भाग आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये. ही कारवाई माझ्या मनाला लागली आहे. त्यापेक्षा राजकारणात राहायचं नको,' असंही आव्हाड म्हणाले.

जयंत पाटील काय म्हणाले?जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'माझा राज्य सरकार आणि पोलिसांना प्रश्न आहे की, काल झालेली घटना ही 354 मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या. मुख्यमंत्री गाडीत असताना, पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त असताना विनयभंग कसा होईल? मनात राग ठेऊन सरकारने ही कृती केली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे पोलिसांनी हे प्रकरण या गुन्ह्यात कसं बसवलं, गृहमंत्र्यांनी नेमकं काय सुरू आहे, ते बघावं,' असं पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJayant Patilजयंत पाटील