शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

झारखंडच्या निकालानंतर शरद पवारांचा मोदी आणि भाजपाला टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 4:48 PM

झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे.

मुंबई -  लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर भाजपाची हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत पिछेहाट झाली होती. आता वर्षाच्या अखेरीस झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. झारखंडच्या जनतेने भाजपाला नाकारले आहे. संधी मिळताच देशातील इतर मतदारही झारखंडप्रमाणेच कौल देतील, असे शरद पवार म्हणाले. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसी संवाद साधला. ''भाजपावर जनतेची नाराजी आहे हे या निकालांमधून दिसत आहे. आज लागलेल्या निकालांमधून झारखंडच्या जनतेने भाजपाला नाकारले आहे. संधी मिळताच देशातील इतर मतदारही झरखंडप्रमाणेच कौल देतील. या निकालांसाठी मी झारखंडमधील जनतेचे आभार मानतो.''असे शरद पवार म्हणाले. 

''झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली शक्ती आणि आर्थिक ताकद यांना न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे,''' असेही शरद पवार यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीने स्पष्ट बहुमतासह सत्ता खेचून आणली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी