शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव, बाळासाहेब थोरातांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 19:47 IST

'२०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेले नाही.

मुंबई -  भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात झारखंडची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली. झारखंडमधील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने जनतेचे जीवनमान प्रचंड खालवले असताना स्थानिक जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून राष्ट्रीय प्रश्न त्यांच्यावर थोपवण्याचे भाजपचे राजकारण झारखंडच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. खोट्या राष्ट्रवादाची अफूची गोळी, कलम ३७० चे भांडवल आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला आहे. आणि भाजपच्या जनविरोधी राजकारणाचा पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.    या संदर्भात थोरात म्हणाले की, ''२०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेले नाही. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून तेथे भाजप आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. काँग्रेस पक्ष तिथे कधीही सत्तेत आला नाही. प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर जाणार आहे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत जवळपास ३७ जागा जिंकून बहुमताच्या जवळपास असणा-या भाजपकडे पाच वर्षात झारखंडचा विकास करण्याची नामी संधी होती. परंतु पाच वर्षात भाजप सरकारने झारखंडला पिछाडीवर नेले.  २०१४ साली ७.३२ टक्के असणारा राज्याच्या सकल उत्पन्न वाढीचा दर हा २०१९ पर्यंत ५.२ टक्क्यांपर्यंत घसरला. बेरोजगारीचा दर हा १५.१ टक्क्यांपर्यंत गेला. दरडोई उत्पन्नामध्ये झारखंडचा क्रमांक २८ वरून ३० वर गेला. गरिबी ८.६ टक्क्यांनी वाढली. उद्योगधंदे बुडाले नविन गुंतवणूक आली नाही. आदिवासींचे प्रश्न अधिक गंभीर झाले. शेतकरी हवालदिल झाला, भूकबळी गेले. हे अपयश झाकण्याकरिता निवडणुकांपूर्वी  महाराष्ट्राप्रमाणेच मेगाभरती हाती घेऊन विरोधी पक्षातून ११ आमदार आयात केले पण झारखंडच्या जनतेने भाजपच्या अनैतिक राजकारणाचा दणदणीत पराभव केला. मोदी शाह यांनी प्रत्येकी ९ सभा घेऊन राज्याच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला, तो ही सपशेल अयशस्वी ठरला आहे.'' ''देशपातळीवर आणखी एक राज्य भाजपच्या हातून गेल्याने काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपला आता स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागेल. भाजपच्या जनविरोधी आणि विभाजनवादी धोरणांविरोधात देशात प्रचंड जनआक्रोश आहे. हे देशपातळीवर सुरू असलेल्या आंदोलनातून आणि आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये येणारे नवे सरकार गरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण,विद्यार्थी यांचे असेल.महाराष्ट्रातील सरकारप्रमाणे झारखंडमधील काँग्रेस आघाडीचे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेईल,'' असा विश्वास करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपा