शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

“राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:31 IST

नवनिर्वाचित नगरसेवकांसह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सांगली: राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित मतेही मिळाली. एवढेच नव्हे तर एका अपक्षाचे अधिकचे मत मिळाले. यानंतर आता एका पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे उभे आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही, असे म्हटले आहे. 

सांगली जिल्ह्यातील खानापूरमधील एकेकाळी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते राहिलेले आणि वसंतदादा पाटील यांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटील बोलत होते. खानापूर नगरपंचायतीच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही दुसऱ्याच कोणत्या पक्षात आला आहात, असे मानू नका. राष्ट्रवादी हा पक्ष कॉंग्रेसच्या विचारावरच, तत्त्वावर चालतो, असा सल्ला पक्ष प्रवेश केलेल्यांना जयंत पाटील यांनी दिला.

पण आम्ही जिद्द सोडली नव्हती

विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीमध्ये कुणीही पक्षप्रवेश करत नव्हते. याऊलट पेपर वाचला की, राष्ट्रवादीमधून काहीजण बाहेर गेले. काही जण जाणार आहे आणि काही जणांची शक्यता आहे, अशा बातम्या वाचायला मिळायच्या, पण आम्ही जिद्द सोडली नव्हती.  शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी झंझावती दौरे महाराष्ट्रभर सुरू केले. त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण बदलून गेले. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या. जवळपास शंभर जागांच्या जवळ दोन्ही पक्षाला यश मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकारणात काहीही होऊ शकते, त्याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाला, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, संपतराव माने हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते म्हणून त्याकाळी ओळखले जायचे. खानापूर तालुक्याचे दोनवेळा ते आमदार झाले होते. सांगलीत काँग्रेस वाढविण्यात संपतराव माने यांचे कार्य मोलाचे राहिले. वसंतदादांचे नातू आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी संपतराव माने यांच्या वारसदारांचे सख्य होते. मात्र काँग्रेस अंतर्गत गटबाजी आणि काँग्रेस पक्षामधून डावलले जात असल्याचा नाराजीतून आता संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केल्याने खानापूर भागातील काँग्रेसबरोबरच वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचा गट ही फुटला.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSangliसांगली