शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
4
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
5
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
6
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
7
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
8
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
9
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
10
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
11
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
12
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
13
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
14
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
15
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
16
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
17
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
18
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
19
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
20
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...

तेजस्वी तारा निखळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:16 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याबरोबर एका प्रयोगात भाग घ्यायचा योग डाॅ. जयंत नारळीकर यांना २००८ मध्ये आला होता, त्या अनुभवावर आधारित काही नाेंदी त्यांनी साधना साप्ताहिकाच्या ३० ऑगस्ट २०१४ च्या अंकात मांडल्या आहेत. त्यातील सारांश...

नारळीकरांनी दिले हाेते फलज्योतिषांना ‘चॅलेंज’ -भारत हा अंधश्रद्धांचा देश आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. ज्याप्रमाणे विचारस्वातंत्र्यामुळे इथे विविध धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान आदींना आसरा मिळाला; त्याचप्रमाणे अंध विश्वासांनादेखील खतपाणी मिळाले. फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा उगम मुळात भारतात झाला नसला, तरी त्यात लक्षणीय वाढ इथेच झाली. आज फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या भारतात जेवढी आहे, तितकी जगातल्या बाकीच्या सर्व देशांत मिळूनही नसावी. या अंधश्रद्धांना आवर घालणारा प्रमुख उपाय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे हाेय. हा दृष्टिकोन विज्ञानातून उद्भवला असला तरी त्याचा वापर इतर क्षेत्रांत, दैनंदिन जीवनात होऊ शकतो. एखादे विधान ठामपणे एखाद्या अधिकारी व्यक्तीने केले, तर ते विश्वासार्ह असेलच असे नाही. त्याची स्वतंत्रपणे तपासणी, शहानिशा करूनच ठरवावे, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. 

उदाहरणार्थ - लग्न यशस्वी की अयशस्वी होईल, हे पत्रिका जुळतात का नाही यावरून ठरते, असे फलज्योतिष सांगते. हे विधान प्रयोगांनी तपासता येईल. लग्न जुळून यशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या आणि लग्ने अयशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या मिसळून (पत्ते पिसावेत तसे) फलज्योतिषतज्ज्ञांना तपासायला द्याव्यात. त्यांनी पत्रिका जुळणे, न जुळणे याबद्दलचे आपले निकष लावून कुठली लग्ने यशस्वी ठरली आणि कुठली नापास झाली, ते सांगावे. त्यांचे निदान वस्तुस्थितीप्रमाणे आहे की नाही, ते संख्याशास्त्राचे नियम ठरवतील. अमेरिकेत असा प्रयोग केला गेला आणि त्यात फलज्योतिष नापास ठरले हाेते. भारतात ही चाचणी विचारपूर्वक घ्यायला हवी, ती कशी घेता येईल? या विवंचनेत मी असताना नरेंद्र दाभोलकर माझ्या मदतीला आले. पत्रिका जुळणे, न जुळणे याला सोपा पर्याय त्यांनी सुचवला. 

लग्न झालेल्या/मोडलेल्या जोडप्यांऐवजी हुशार/मतिमंद अशा मुलांची चाचणी घ्यावी. ‘हुशार’ हे विशेष शाळेत त्या मुलाच्या कीर्तीवरून ठरवणे सोपे आहे. त्याचप्रमाणे मतिमंद मुलाच्या शाळेत त्यांची माहिती मिळू शकते. एकूण, इथे शंका घ्यायला जागा नाही. फलज्योतिषांचा दावा असतो की- जन्मपत्रिकेमधून सांगता येते की, ज्याची ती पत्रिका आहे तो विद्यार्थी हुशार आहे की मतिमंद. तपासणीच्या प्रयोगासाठी दाभोलकरांनी अंनिसच्या मदतीने ही माहिती गोळा करायची तयारी दाखवली. यात विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक सुधाकर कुंटे यांनी प्रयोगाची एकंदर आखणी आणि कृतीबाबत मार्गदर्शन करायची जबाबदारी स्वीकारली. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती (जन्मवेळ, जन्मस्थान आदी) घेऊन त्याची पत्रिका बनवायचे काम प्रकाश घाटपांडे  यांनी अंगावर घेतले. घाटपांडे हे पूर्वी स्वत: फलज्योतिषाचा व्यवसाय करत; पण नंतर त्यातील सत्याचा अभाव पाहून त्यांनी तो सोडून दिला हाेता. 

अंनिसच्या मदतीने आम्ही शंभर हुशार मुले व शंभर मतिमंद मुले यांची आवश्यक ती माहिती मिळवली आणि घाटपांडे यांनी ती माहिती वापरून त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या. सर्व पत्रिकांचे सांकेतिक रेकॉर्ड सुधाकर कुंटे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय कुठली कुंडली कोणाची, हे सांगणे शक्य नव्हते. प्रयोगाची सुरुवात म्हणून आम्ही चौघांनी दि. १२ मे २००८ रोजी पत्रकार परिषद घेत व्यावसायिक फलज्योतिषांनी या प्रयोगात भाग घ्यावा, असे आवाहन केले. फलज्योतिषांनी सदर कुंडल्यांचा अभ्यास करून प्रत्येक कुंडलीवर ती हुशार मुलाची आहे की मतिमंद मुलाची? ते त्यावर लिहून पाठवावे. या प्रयोगात भाग घेण्यासाठी ५१ फलज्योतिष तज्ज्ञांनी रजिस्टर्ड पाकिटे पाठवली. पण त्यांपैकी २७ स्पर्धकांनी उत्तरे पाठविली. त्यात सर्वोच्च रेकॉर्ड ४० पैकी २४ बरोबर- त्यापाठोपाठ दोघांचे ४० पैकी २२ बरोबर. म्हणजे ४० पैकी २८ ही ‘पास’ व्हायची लाइन कोणीही ओलांडू शकला नाही. 

सर्व २७ स्पर्धकांच्या मार्कांची सरासरी ४० पैकी १७.२५ होती. यावर काही फलज्योतिषी म्हणू लागले की, ज्या स्पर्धकांनी भाग घेतला ते निष्णात फलज्योतिषी नव्हते; म्हणून निकाल फलज्योतिषाविरुद्ध लागला. पण आमच्याकडे जे ५१ स्पर्धक प्रथम आले, त्या सर्वांनी स्वत:चा अनेक वर्षांचा त्या विषयाचा अनुभव मांडला होता. शिवाय एका संस्थेने भाग घेतला, त्याचे काय? त्या संस्थेतील सगळे सदस्य फलज्योतिषी नव्हते का? या धर्तीवर आणखी प्रयोग करता येण्याजोगे आहेत. खुद्द नरेंद्र दाभोलकरांचा त्याला पाठिंबा होता. त्यांच्या पश्चात इतर सत्यशोधक त्यासाठी पुढे येतील, अशी आशा आहे.

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकर