शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जात पंचायतीने महिलेला, दिली थुंकी चाटण्याची शिक्षा? नीलम गोऱ्हे यांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 8:15 AM

पीडित महिलेने वडगाव येथील एका व्यक्तीसोबत २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. परंतु, जात पंचायतच्या पंचांना तो मान्य नव्हता.

 निहिदा : पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतचे महत्त्व कायम आहे. जात पंचायती कायद्याला जुमानत नसल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव येथे ९ एप्रिल रोजी घडली. पहिल्या पतीशी कायदेशीर फारकत घेत महिलेने केलेले दुसरे लग्न अमान्य करीत, तिला जात पंचायतने एक लाख रुपयांच्या दंडासह पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावल्याचा प्रकार विधान परिषदेच्या उपसभापती आ. नीलम गोऱ्हे यांच्या पत्रामुळे बुधवारी उघडकीस आला. परंतु, जात पंचायतच्या सदस्यांसह महिलेच्या नातेवाइकांनी असा प्रकार घडलाच नसल्याचे स्पष्ट केले.

पीडित महिलेने वडगाव येथील एका व्यक्तीसोबत २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. परंतु, जात पंचायतच्या पंचांना तो मान्य नव्हता. दरम्यान, पीडित महिलेने २०१९ मध्ये एका घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाहसुद्धा पंचांनी अमान्य करीत, जात पंचायतीने तिला एक लाख रुपयांचा दंड केला. महाराष्ट्रातील पंच एकत्र येऊन न्यायनिवाडा करीत, पीडित महिलेला व तिच्या परिवारास जात बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या पतीसोबत राहावे, असा निर्णय पंचांनी दिला. एवढेच नाहीतर पंचांनी केळीच्या पानावर थुंकून, ती थुंकी चाटण्याची अजब शिक्षा ९ एप्रिल रोजी पीडित महिलेला दिली. या प्रकरणाची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मिळाल्यावर, त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून, कारवाई करण्याची मागणी केली. ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. परंतु, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वडगावात असा प्रकार घडला नसल्याचे समोर आले.

‘शिक्षा दिलीच नाही’पोलीस गावात पोहोचल्यावर, सर्व प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. ग्रामस्थांनीसुद्धा महिलेला जात पंचायतच्या पंचांनी अशी कोणतीही शिक्षा केली नसल्याचे पोलिसांना निक्षून सांगितले. घटनेबाबत फारसे कोणी बाेलण्यास तयार नसल्याचे पोलीस चौकशीत दिसून आले.

एक महिन्यापूर्वी जात पंचायत भरली होती. मात्र, त्यामध्ये थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावली नाही. जात पंचायतने तिला कोणतीही शिक्षा दिली नाही. - वंदना शेगर, पीडितेची बहीणजात पंचायत भरली की नाही, हे माहीत नाही. परंतु, थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार घडला नाही, असा जबाब आम्ही पिंजर पोलिसांकडे नोंदविला आहे.- संजय निळखन, पोलीस पाटील 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी