शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पदवीधर मतदारसंघातून जनता दल सेक्युलरतर्फे प्रा. शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:10 IST

politics, jantadalsceular, pune, kolhapur, sangli, satara, solapur, padwidhar, elecation, saradpatil जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे वतीने विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे पुणे पदवीधर मतदारसंघातून जनता दल सेक्युलरतर्फे प्रा. शरद पाटील पक्षाचे वतीने उमेदवारी जाहीर

मुंबई - जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे वतीने विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पक्षाचे वतीने राष्ट्रीय महासचिव बी.जी. कोळसे पाटील, राज्य प्रधान महासचिव प्रताप होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, युवा अध्यक्ष नाथा शेवाळे, कार्याध्यक्ष रेवण भोसले, उपाध्यक्ष डॉ. पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. प्रा. शरद पाटील हे मिरज विधानसभा मतदारसंघांतून दोन वेळा निवडून आले होते. तसेच विधानपरिषदेवर इ. स. २००२ मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघांतून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार प्रकाश जावडेकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी होणा-या पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये प्रा. शरद पाटील यांना पदवीधर मतदारांनी क्रमांक १ चे मत देऊन पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.

या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनीही प्रा. शरद पाटील यांच्या उमेदवारीस पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन या नेत्यांनी जनता दलाच्या वतीने केले आहे.प्रा. शरद पाटील यांना विधानसभेचा १० वर्षे व विधानपरिषदेचा ६ वर्षे याप्रमाणे दीर्घ अनुभव आहे. विधानपरिषद सदस्य व जनता दल प्रदेश अध्यक्ष या नात्याने पुणे पदवीधर मतदारसंघात ते सुपरिचित आहेत. प्रा. शरद पाटील यांच्या उमेदवारीस अनेक पुरोगामी व लोकशाही पक्ष व संघटनांकडून पाठींबा मिळत आहे अशीही माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणेSatara areaसातारा परिसरSangliसांगलीSolapurसोलापूरkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई