शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘जय’चा शोध नव्याने सुरू

By admin | Updated: September 27, 2016 01:59 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी सोमवारपासून राज्यभरात तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वनांमध्ये वनरक्षक

अमरावती : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी सोमवारपासून राज्यभरात तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वनांमध्ये वनरक्षक, वनपालांंची पायपीट सुरू झाली आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी वरिष्ठांना सादर केला जाईल.‘जय’ वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असून त्याच्याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. सोमवारपासून सकाळी ८ ते सायंकाळी ७ या कालावधीत वनांमध्ये ‘जय’चा काही ठावठिकाणा लागतो का, याचा शोध घेतला जात आहे. ‘जय’ हा अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला असावा, असा अंदाज काही वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्याकरिता ही शोधमोहीम नव्याने सुरू झाली आहे.विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आदी भागांतील विस्तीर्ण जंगलात ‘जय’चा शोध घेण्यासाठी संपूर्ण वनविभाग कामाला लागला आहे. (प्रतिनिधी)वनरक्षक, वनपालांच्या निरीक्षणाअंती येणारा अहवाल उपवनसंरक्षकांना सादर केला जाईल. पुढे हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. वडाळी, पोहरा जंगलात शोधमोहीम सुरू झाली आहे.- हरिश्चंद्र पडगव्हाणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी