शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पावसात रंगला भक्तीचा मेळा.. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणीकाळभोरमध्ये विसावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 5:29 PM

 पुण्यातील निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात सकाळी विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजाच्या पादुकांची पुजा झाली .त्यानंतर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला

ठळक मुद्देपुण्यातून भक्तिभावयुक्त निरोप घेऊन तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी भव्य रांगोळ्या फुलांची सजावट आकर्षक कमानी

- तेजस टवलारकार-  पुणे - भागवत सांप्रदायाची पताका फडकावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करत पंढरीस निघालेल्या श्री संत तुकोबाराय यांची पालखी लाखो वैष्णवांसोबत मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पुण्याहुन लोणीकाळभोरमध्ये पोहचली.          पुण्यातील निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात सकाळी विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजाच्या पादुकांची पुजा झाली .त्यानंतर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला .ढगाळ वातावरणात पालखी सोहळ्याची हडपसरच्या दिशेने वाटचाल सुरू झाली .रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठीं गर्दी पालखीचे दर्शन घेण्यासाठी होती. सर्वत्र जय हरी माऊलीचा नामघोष सुरु होता. या नामसंकीर्तन, अभंगात पालखीची वाटचाल सुरू होती. पुण्यातून भक्तिभावयुक्त निरोप घेऊन तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यावर तिचा पहिला विसावा हा हडपसर गाडीतळ येथे झाला.पालखी स्थळावर परिसरातील भाविक दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत होते .दिड्यांमधून दुमदुमणारा टाळ विणेच्या झंकारात हरिनामाच्या जयघोषाने आनंदाला आसमंत निनादून गेला. सर्वत्र भक्तीचा रंग चढत होता .ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी भव्य रांगोळ्या, फुलांची सजावट आकर्षक कमानी उभारण्यात आली होती. वारकरी अभंगाच्या तालावर नाचत गात होते.  पालखीच्या दिंडीतील हा क्षण मनात घर करून राहणार होता. वारकसोबत मोठ्या प्रमाणात नागरिक वारीत सहभागी झाले होते.  पालखी हडपसरला आगमन करताच पाऊस सुरू झाला पावसातही भाविक पालखीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते व माऊली तुकारामांचा गजर करत आनंद घेत होते. यावेळी महापौर मुक्त टिळक उपस्थित होत्या. हडपसर पोलिसांच्या  वतीने तुकाराम महाराजाचे तेरावे  वंशज संतोष मोरे महाराज यांचा सत्कार करण्यात आला   पालखी विश्रांतीसाठी हडपसर ला पोहोचली भाविक जेवणाची व फराळाचे वाटप करून वारकऱ्यांची सेवा करत होते. भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी मोठी होती. भाविक व वारकऱ्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. त्यानंतर दुसरा  विसवाची वेळ झाली. मांजरी फार्म येथे दुपारचा विसावा झाला. विसाव्यात वारकरी अभंग ,भारुड गात फुगड्या खेळत होते व भक्तीचा आनंद घेत होते. त्यानंतर लोणीच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी