"संजय राऊतांचं नामांतर करण्याची वेळ आली आहे, त्याचं नाव..."; शहाजी बापू पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:16 IST2023-02-24T16:14:49+5:302023-02-24T16:16:19+5:30

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Its time to change Sanjay Raut name Criticism of Shahaji Bapu Patil | "संजय राऊतांचं नामांतर करण्याची वेळ आली आहे, त्याचं नाव..."; शहाजी बापू पाटील यांची टीका

"संजय राऊतांचं नामांतर करण्याची वेळ आली आहे, त्याचं नाव..."; शहाजी बापू पाटील यांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला मला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर विविध नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

"संजय राऊत यांचं आडनाव आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यांचं नामांतर करुन संजय आगलावे असं नाव ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एका निष्पाप, प्रमाणिकपणे चांगलं काम करणाऱ्या तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदे यांच्यावर असे आरोप करत आहेत. असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊत यांनाच काय, तर कुणालाच शोभणारं नाही. बेभान झालेले संजय राऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील याचा काही नेम राहिलेला नाही", असं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले. 

संजय राऊतांनीही दिली प्रतिक्रिया
शहाजी बापू पाटलांच्या या टीकेनंतर संजय राऊतांनी पलटवार केला आहे. शहाजीबापू पाटलांच्या टीकेबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, “हा कोण शहाजी? हा खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. यामुळे भोसले घराण्याचा अपमान होतोय.”

Web Title: Its time to change Sanjay Raut name Criticism of Shahaji Bapu Patil