शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

चालत्या रेल्वेत चढणे गुन्हा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:31 IST

चालत्या रेल्वेगाडीत चढणे गुन्हा नाही, असा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात केला आहे. रेल्वेकायद्यातील कलम

- लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालत्या रेल्वेगाडीत चढणे गुन्हा नाही, असा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात केला आहे. रेल्वेकायद्यातील कलम १५४ व १५६मध्ये रेल्वेशी संबंधित फौजदारी कृतीसाठी शिक्षेची तरतूद आहे. कलम १५४ अनुसार रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात टाकणे व कलम १५६ अनुसार रेल्वेगाडीच्या छतावर, पायऱ्यांवर व इंजिनवर बसून प्रवास करणे गुन्हा आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने चालत्या रेल्वेगाडीत चढणे फौजदारी कृतीमध्ये मोडत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, चालत्या रेल्वेगाडीत चढताना खाली पडून मृत्यू किंवा गंभीर इजा झाल्यास पीडित प्रवासी भरपाई मिळण्यास पात्र असल्याचे सांगितले. कायद्यातील कलम १२३ (सी)(२) मध्ये दुर्दैवी घटनांची व्याख्या देण्यात आली आहे. त्या व्याख्येत मोडणाऱ्या घटनांतील पीडित प्रवाशाला भरपाई देण्यासाठी कलम १२४ (ए) मध्ये तरतूद आहे. परंतु, कलम १२४ (ए)(सी) अनुसार प्रवाशाने स्वत: फौजदारी कृती केल्यास तो भरपाईस अपात्र ठरतो. तथापि, कलम १२३ (सी)(२)मधील व्याख्येत चालत्या रेल्वेगाडीत चढताना खाली पडण्याच्या घटनेचा समावेश नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ‘केंद्र शासन वि. प्रभाकरन’ प्रकरणावरील निर्णयात दुर्दैवी घटनांना व्यापक अर्थ दिला आहे. एखाद्या कलमातील तरतुदीचा अर्थ प्रशासन व पीडित या दोघांनाही मदत करणारा निघत असल्यास पीडितालाच झुकते माप दिले गेले पाहिजे, असे या निर्णयात नमूद करण्यात आले. या निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयाने संबंधित पीडित प्रवाशाला भरपाईसाठी पात्र ठरविले.असे आहे मूळ प्रकरणशशिकांत नंदकिशोर ढगे (२१) हा २९ आॅगस्ट २०१० रोजी अधिकृत आरक्षण घेऊन रेल्वेप्रवास करीत होता. तो चंद्रपूर रेल्वेस्थानकावर टुथब्रश खरेदी करण्यासाठी उतरला. दरम्यान, रेल्वेगाडी सुरू झाली. चालत्या रेल्वेगाडीत बसण्याचा प्रयत्न करताना तो पाय घसरून खाली पडला. त्यामुळे त्याचा डावा पाय मांडीपासून कापावा लागला. त्याने भरपाई मिळण्यासाठी सुरुवातीला रेल्वे दावा न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. मात्र हे प्रकरण दुर्दैवी घटनांच्या व्याख्येत मोडत नसल्याचे सांगून न्यायाधिकरणने दावा फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हे अपील मंजूर केले. पीडिताला तीन महिन्यांमध्ये सात टक्के व्याजासह ४ लाख ८० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला.