शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो आमचाच, पण...; 'मोठं मन' दाखवतानाच सेनेची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:47 IST

मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचं भाष्य

मुंबई: लहान भाऊ, मोठा भाऊ आणि त्यावरुन सुरू झालेला मुख्यमंत्रिपदाचा वाद यावरुन शिवसेनेनं 'मन की बात' केली आहे. मुख्यमंत्री कुणाचाही झाली तरी तो आमचाच असेल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं सांगत राजकारणात 'मी'ला नाही, तर 'आम्ही'ला ताकद असल्याचं राऊत म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसं ठरलं तसंच घडेल आणि मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचं आधीच सोडवलेलं उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल, अशा शब्दांमध्ये 'सामना'मधून मुख्यमंत्रीपदावर भाष्य करण्यात आलं. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 'मुख्यमंत्री भाजपाचा असेल तरी आमचा आणि शिवसेनेचा असेल तरी आमचा,' असं राऊत म्हणाले. राजकारणात 'मैं'ला नव्हे, तर 'हम'ला ताकद असते, असंदेखील त्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, असं म्हणत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही कटुता नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. 'आमच्यात कुरघोडी वगैरे काही नाही. सगळं अगदी खुसखुशीत, चमचमीत आहे. समोर पंचपक्वानांचं ताट वाढलेलं असताना ते उधळण्याचा नतद्रष्टपणा आम्ही करणार नाही. ठिणगी पडू नये, वाद होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,' असं राऊत यांनी सांगितलं. 'दोघांची सत्ता आणणं हेच ध्येय आहे. सत्तेचं समसमान वाटप यात सगळं काही येतं. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली त्याप्रमाणे सगळं होईल,' असं राऊत म्हणाले. 
सामनामधून काय म्हणते शिवसेना?महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच; पण हे काही न सुटणारे कोडे नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसे ठरले तसेच घडेल व या कोड्याचे आधीच सोडवलेले उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल. तोपर्यंत भाजप व शिवसेनेच्या मंडळींनी ‘युती’च्या प्रकृतीस ओरखडा न लावता बोलत राहायचे, ‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’ युती विजयाचा यापेक्षा दुसरा कोणताही ‘फॉर्म्युला’ असूच शकत नाही. रावसाहेब दानवे यांचे आभार तरी किती मानावेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे सोडवले आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला? 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहा