शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

'इतकं स्पष्ट बोलूनही शिंदेंवर आरोप करणं योग्य नाही'; संजय शिरसाटांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 15:39 IST

महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे. पण, या कार्यक्रमात किती नेते शपथ घेणार याबद्दल कोणतीही स्पष्टता अद्याप आलेली नाही. 

Mahayuti Maharashtra Chief Minister: महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असली, तरी सरकार स्थापन करण्यात अनेक अडथळे निर्माण होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीत बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप शपथविधी आणि मंत्रिमंडळाबद्दल कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे एकप्रकारे राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. महायुतीची मुंबईत बैठक होणार होती, पण ती रद्द झाल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली.  एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, "    एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना सांगितलं आहे. महायुतीचे सरकार आले आहे. प्रचंड बहुमत मिळाले आहे. मी त्यात अडथळा आहे, असे कोणाला वाटत असेल, तर मी स्पष्ट सांगू इच्छितो की, जो निर्णय वरिष्ठ घेतील, तो आम्हाला मान्य असेल. आमची कोणतीही मागणी नाहीये. इतके स्पष्ट बोलल्यानंतरही त्यांच्यावर आरोप करणे योग्य नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे." 

'कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे याचा निर्णय शिंदेंना घ्यावा लागेल'

"आता वरिष्ठ जो कोणता निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. नेत्यांनी निर्णय कधी घ्यायचा, यासाठी आम्ही आग्रह करू शकत नाही. त्यांचा आदेश जो काही असेल, तो आम्ही स्वीकारू. एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख आहेत. कोणते पद घ्यायचे, कोणते घ्यायचे नाही, याचा निर्णय घ्यावाच लागेल. कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, याचाही निर्णय घेतील. पक्षाची विचाराधारा काय असेल, याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. त्यांच्याकडे हे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आम्ही त्यांची गटनेता म्हणून निवड केली आहे", अशी माहिती शिरसाट यांनी दिली. 

"या सगळ्या गोष्टींची त्यांना चिंताही असते आणि निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना विचारही करावा लागतो. आज महायुतीची बैठक व्हायला हवी. कारण वेळ खूप कमी राहिला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक जरूर होईल, असा माझा अंदाज आहे. बैठकीत खातेवाटपाबद्दल चर्चा होईल, असे संजय शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीSanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना