शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

By संतोष कनमुसे | Updated: November 6, 2025 16:33 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला. या प्रकरणाची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणावर आज शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पार्थ पवार यांच्याकडून खुलासा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच जर नियमबाह्य काही झाले नसेल तर त्यांची बदनामी करणे चुकीचे असल्याचे सांगितले.

मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

माध्यमांसोबत बोलताना उदय सामंत म्हणाले,  "उद्योग विभागाशी आणि एमआयडीसी विभागाचा यामध्ये काहीकी संबंध आहे असे मला वाटत नाही. अनेक सेक्टरांना आम्ही सवलती देतो, मुद्रांक शुल्कमध्ये सवलती दिल्या जातात. पण ही सवलत आयटी विभागामध्ये द्यायची नाही ही आमची भूमिका आहे. यामुळे याचा आमच्याशी काही संबंध नाही हेच आम्हाला वाटले होते, तरीही मी आज याची पूर्ण माहिती घेतली, असंही उदय सामंत म्हणाले. 

"मुद्रांक शुल्क रद्द करणे ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि त्यामधून काही गोष्टी नियमबाह्य घडल्या असतील. त्या घडल्या आहेत की नाही हे मला माहित नाही. त्यामुळेच त्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असेल. पण, थेट पार्थ पवार यांच्यासोबत संबंध जोडत असताना आपण त्यांच्याकडून खुलासा घेणे गरजेचे आहे. जर नियमबाह्य काही झालं नसेल तर पार्थ पवार यांची बदनामी करणे योग्य आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे आपण त्याच्यांशी चर्चा करावी. त्यांच्याकडून खुलासे घ्यावेत, असंही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clarification needed from Parth Pawar; no industry link: Minister

Web Summary : Minister Uday Samant stated Parth Pawar should clarify land deal allegations. The industry department has no connection to the deal. An official was suspended for irregularities. Samant emphasizes fairness, urging clarification before tarnishing Pawar's reputation if no rules were broken.
टॅग्स :Uday Samantउदय सामंतparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना