शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणांना पाडणं महत्वाचं; आता दाखवू, पैशात दम आहे की आमच्या...! बच्चू कडू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 12:58 IST

"...म्हणजे खोके घेतल्या शिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही, अरे असं असंत तर आम्ही कधीच आमचं चित्र पालटलं असतं. तुमच्या सारखं स्वाभिमानी पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधला नसता. तुमचे राजकारण आहे. तुमचा प्रकार आहे. इमानदारीने राहू आणि इमानदारीने काम करू."

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारीही दिली आहे. मात्र, बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांच्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत. तसेच, बच्चू कडू यांनीही, सर्वच मोठ्या नेत्यांनी एकत्रित होऊन या निवडणुकीकडे बघायला हवे. आपल्या पेक्षाही ज्याला पाडायचे आहे, ते टार्गेट लक्षात घेऊन समोर जायला हवे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार निवडून येतो हे महत्वाचे नाही, तर नवनीत राणा यांना पाडणे महत्वाचे आहे, असे म्हटले आहे.

आता दाखवू ना पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिक पणात? -रविराणा यांनी नुकतेच बच्चू कडू यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांना, अमरावतीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "घरात घुसून मारण्याची भाषा, कुठेही जाता तर पैसेच खाऊन जातात, आता दाखवू ना पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिक पणात? म्हणजे खोके घेतल्या शिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही, अरे असं असंत तर आम्ही कधीच आमचं चित्र पालटलं असतं. तुमच्या सारखं स्वाभिमानी पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधला नसता. तुमचे राजकारण आहे. तुमचा प्रकार आहे. इमानदारीने राहू आणि इमानदारीने काम करू." कडू टीव्ही 9 सोबत बोलत होते.

400 पार आहेत, एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही! -काल भाजप नेते नवनीत राणा यांच्यासोबत दिसले, ते त्यांचा प्रचार करतील? यासंदर्भात बोलताना कडू म्हणाले, त्यांनी कार्यकर्ता म्हणून काय करावे? काय करू नये? किती लाचारी पत्करावी? जेव्हा पक्ष कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा कार्यकर्त्यांनीही काही क्षणापुरता पक्षाचा विचार करू नये. तसेही 400 पार आहेत. त्यामुळे एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही. 300 खासदार आले तर मोदी सांहेबांची सत्ता वाचणारच आहे. त्यामुळे हा अतिरेक थांबवा. अशी मी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही विनंती करेन, असेही कडू यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाBachhu Kaduबच्चू कडूBJPभाजपाRavi Ranaरवी राणा