छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या मुद्यावरुन सभागृहात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 01:57 PM2017-12-15T13:57:31+5:302017-12-15T15:08:18+5:30

इचलकरंजीचे भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी विधानसभेत केली.

On the issue of Chhatrapati Shivaji Maharaj's birth date, | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या मुद्यावरुन सभागृहात गोंधळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या मुद्यावरुन सभागृहात गोंधळ

Next

नागपूर- इचलकरंजीचे भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी विधानसभेत केली. हाळवणकरांच्या या मागणीनंतर विरोधकांनी वेलमध्ये उतरून गदारोळ केला. 

शिवाजी महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1630 रोजी झाला. याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार आहे. त्यामुळे यावर सरकारने एक संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी.’ अशी मागणी त्यांनी केली. राज्यात दोनदा जयंती साजरी होण्याऐवजी एकदा साजरी केली जावी असा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. हाळवणकर यांच्या या मागणीनंतर सभागृहात विरोधकांनी गदारोळ करत घोषणाबाजी केली. 

‘महाराजांच्या जयंतीबाबत विसंगत बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही.’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली.याबाबत वाद निर्माण करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा बंद झालेला घोळ पुन्हा सुरू करू नये. व ज्यांना इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही अशांनी असं भाष्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या मनाला डिवचेल, असं वागू नये, त्यामुळे याविषयी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली.

तसंच हाळवणकर यांचं म्हणणं रेकॉर्डवरुन काढण्याची जोरदार मागणीही विरोधकांनी केली. पण, सदस्याने केवळ माहिती दिली आहे. यामुळे यात काहीही असंसदीय नसल्याचं सांगून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांची मागणी फेटाळली.

Web Title: On the issue of Chhatrapati Shivaji Maharaj's birth date,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.