शहरं
Join us  
Trending Stories
1
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
2
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
3
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
4
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
5
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
6
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
7
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
8
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
9
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
10
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
11
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
12
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
13
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
14
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
15
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
16
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
17
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
18
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
19
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
20
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?", कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:01 IST

Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. उमेदवार अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६७ ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. त्यावरूनच सिब्बल यांनी आयोगाला सवाल केला. 

Maharashtra Municipal Election Results 2026: "निवडणूक आयोगाला याबद्दल चिंता वाटतेय का?", असा संतप्त सवाल करत खासदार कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीबद्दल महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक होत आहे. मतदानापूर्वीच ६७ ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याच मुद्द्याबद्दल कपिल सिब्बल यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 

२९ महापालिकांमध्ये ६७ ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शंका व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे, यात बहुतांश उमेदवार हे भाजपा आणि शिंदेसेनेचे आहेत. विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. पैसे देऊन, पोलिसी दबाब टाकून माघार घ्यायला लावल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. महाराष्ट्रातील या निकालांबद्दल खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. 

सिब्बल महाराष्ट्रातील निवडणुकीबद्दल काय म्हणाले?

"महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ६९ जागांपैकी भाजपा आणि शिंदेसेनेचे तब्बल ६८ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती पाहता आपली निवडणूक व्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. निवडणूक निकालांवर पैसा आणि राजकीय वर्चस्व यांचाच मोठा प्रभाव दिसून येत असून, तेच निकालांची दिशा ठरवत आहेत. निवडणूक आयोग याबद्दल खरंच चिंतेत आहे का?", असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

ज्या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे. अशा जागांचा निवडणूक आयोगाने आयुक्तांकडून चौकशी करून अहवाल मागवला आहे. 

एखाद्या प्रभागामध्ये निवडणूक बिनविरोध झाल्यास राज्य निवडणूक आयोगाला सविस्तर अहवाल पाठवण्यात यावा आणि आयोगाने मान्यता दिल्यानंतरच निकाल जाहीर करण्यात यावा, असा निवडणूक आयोगाचा आदेश आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने २००४ मधील आदेशाचा आधार घेत आयोगाने बिनविरोध निवड झालेल्या प्रभागांमधील वस्तुनिष्ठ अहवाल संबंधित आयुक्तांकडून मागवला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kapil Sibal Questions Election Commission's Concern Over Maharashtra Election

Web Summary : Kapil Sibal raises concerns about unopposed wins in Maharashtra municipal elections, dominated by BJP and Shinde Sena. Allegations of coercion and financial influence plague the process. Election Commission seeks report.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६kapil sibalकपिल सिब्बलMahayutiमहायुतीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाShiv Senaशिवसेना