शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:10 IST

नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती विसर्जनास बंदी असल्याने उंच गणेशमूर्तींबाबत धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत राज्य सरकारला दिले होते.

मुंबई : सात-आठ फुटांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्याऐवजी कृत्रिम तलावात करणे शक्य आहे का? आणि शक्य असल्यास तेवढे खोल कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? असे प्रश्न करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत गुरुवारी माहिती देण्याचे निर्देश दिले.नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती विसर्जनास बंदी असल्याने उंच गणेशमूर्तींबाबत धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत राज्य सरकारला दिले होते. बुधवारच्या सुनावणीत राज्याचे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले की, पाच फूट व त्यापेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात येतील. पाच फुटांहून अधिक उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलसाठ्यांत करण्याची परवानगी देण्यात येईल. पीओपी पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच महापालिका सर्व मूर्ती पाण्यातून बाहेर काढेल. ७ हजारांहून अधिक मूर्ती पाच फुटांहून उंच आहेत आणि १.९६ लाख मूर्ती पाच फुटांपेक्षा कमी उंचीच्या आहेत.७,००० हून अधिक मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलसाठ्यात करण्यास परवानगी देण्याची सरकारची भूमिका फारशी न रुचल्याने मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सात ते आठ फूट उंचीच्या पीओपी मूर्तींसाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का, असा प्रश्न केला. ७००० हा आकडा मोठा  आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचेल. १० फूट उंच मूर्तींचे  विसर्जन कृत्रिम तलावात करण्याची सोय नाही का, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर नकारात्मक उत्तर देताना सराफ यांनी सांगितले की, एका मूर्तीसाठी एक कृत्रिम तलाव वापरावा लागेल आणि अन्य छोट्या मूर्तींचे विसर्जन त्यात होऊ शकणार नाही. मुंबईत ३,८६९ मूर्ती पाच ते दहा फूट उंचीच्या दरम्यान आहेत. तर दहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या ३,९०० मूर्ती आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

हानी कमी होण्यासाठी...पर्यावरणाची कमी हानी व्हावी, हेच आम्हाला वाटते. त्यामुळे आठ फूट उंचीच्या मूर्तींचेही कृत्रिम तलावात विसर्जन करता येईल का? यावर विचार करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवली. ठाण्याचे रहिवासी व पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जन करण्यात येऊ नये, त्यासंबंधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारला, एमपीसीबी व महापालिकांना द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवState Governmentराज्य सरकार