पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:54 IST2025-06-30T10:52:20+5:302025-06-30T10:54:04+5:30

Iran Banner, Flags in Pune: जम्मू काश्मीरमधील भारतीय मुस्लिम आणि इराणचा तसा जवळचा संबंध आहे. एवढेच नाही तर खामेनी आणि भारताचा देखील संबंध आहे. परंतू पुण्यात त्यांचे बॅनर झळकण्याचे कारण काय...

Iranian flags, Ayatullah Khamenei banners appear in Pune's Loni Kalbhor; Video goes viral..., police removed it | पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

एकीकडे इराण-इस्रायल युद्धविराम झालेला असताना दुसरीकडे पुण्यात इराणचे झेंडे आणि तेथील सुप्रिमो अयातुल्लाह खामेनी यांचे पोस्टर झळकल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी हा प्रकार निदर्शनास आला आहे. आज सोमवारी पोलिसांनी हे बॅनर आणि झेंडे काढून टाकले आहेत. 

इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...

जम्मू काश्मीरमधील भारतीय मुस्लिम आणि इराणचा तसा जवळचा संबंध आहे. एवढेच नाही तर खामेनी आणि भारताचा देखील संबंध आहे. खामेनींचे पणजोबा हे उत्तर प्रदेशमधील आहेत. यामुळे इराणध्ये काही घडले की काश्मीर खोऱ्यात काही समुदाय आंदोलने करतात. यावेळी करण्यात आली होती. परंतू, या हिंसक आंदोलनाला वेळीच रोखण्यात आले होते. 

परंतू, पुण्यात इराणचे झेंडे आणि खामेनींचे पोस्टर लावण्यात आल्याने खळबळ उडाली होती. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात इराण देशाचे झेंडे आणि खामेनी यांचे बॅनर लावण्यात आले होते. लोणी काळभोरमधील हा प्रकार समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल होताच उघडकीस आला होता. पोलिसांनी हे झेंडे आणि बॅनर हटविले आहेत. हे बॅनर, झेंडे कोणी लावले याचा पोलीस शोध घेत आहेत. 

खामेनी आणि भारत...
अयातुल्ला खामेनेई आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. १९ व्या शतकात खामेनेई यांचे पणजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म बाराबंकी जवळच्या किंतूर गावात झाला होता. मुसावी हे १८३० मध्ये किंतूरहून इराणला गेले आणि तिथेच स्थायीक झाले. 

 

 

Web Title: Iranian flags, Ayatullah Khamenei banners appear in Pune's Loni Kalbhor; Video goes viral..., police removed it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.