शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वारे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

By admin | Updated: January 25, 2015 01:04 IST

स्थिरस्थावर होऊ लागलेले फडणवीस यांचे सरकार नवी विटी, नवे राज्य या म्हणीला अनुसरून लवकरच आपल्या पसंतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याच्या पदांवर नेमेल,

डिप्पी वांकाणी - मुंबईस्थिरस्थावर होऊ लागलेले फडणवीस यांचे सरकार नवी विटी, नवे राज्य या म्हणीला अनुसरून लवकरच आपल्या पसंतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याच्या पदांवर नेमेल, याची जोरदार चर्चा आयपीएसच्या गोटात सुरू झाली आहे. साधारणपणे मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतर फेब्रुवारीत बऱ्याच बदल्या होतील, असा अंदाज एका ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. अर्थात या बदल्यांमध्ये पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सह-आयुक्त (गुन्हे) यांचा समावेश नसेल, अशी अटकळ खात्रीशीरपणे व्यक्त होत आहे. राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक के. पी. रघुवंशी फेब्रुवारी अखेरीस निवृत्त होतील. त्यामुळे ते पद रिक्त होईल. त्याखेरीज महासंचालकाच्या समकक्ष दर्जाचे आणखी एक पद सीआयडी (गुन्हे) किंवा तुरुंग विभागासाठी नव्याने निर्माण करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. हा विचार कृतीत आला, तर रघुवंशी निवृत्त होतील तेव्हा बदली-बढतीसाठी महासंचालक दर्जाची दोन पदे उपलब्ध असतील. म्हणजेच अतिरिक्त महासंचालक पदावर असलेल्यांपैकी दोघांना बढतीची संधी मिळू शकते. पण त्याऐवजी मुंबईच्या आयुक्तांनाच महासंचालकाचा दर्जा देण्याचा पर्यायही सरकारसाठी खुला आहे. यापूर्वी एम. एन. सिंग यांनी महासंचालकाच्या दर्जावर मुंबईचे आयुक्तपद भूषविले होते. सध्याचे आयुक्त राकेश मारिया अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. आयुक्तपदावरील मारियांची कारकीर्द नावे ठेवायला जागा नाही, अशी राहिली असल्याने तूर्तास तरी त्यांना अन्यत्र कोठे पाठविण्याचा विचार सरकारला अग्रक्रमाने करावा लागेल, अशी स्थिती नाही. सह-आयुक्त सदानंद दाते यांचे काम आणि प्रतिमा यांचा विचार केल्यास त्यांच्याही बदलीचा विषय चर्चेला येण्याचे कारण नाही. पण एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दाते यांनी स्वत:च केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यात स्वारस्य दाखविले आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीच्या प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव आहे. प्राप्त परिस्थितीत आयुक्त अणि सह-आयुक्तांची बदली करायचीच असा चंग फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृह विभागाने बांधलाच तर या पदांवर कोण येऊ शकते, याच्याही अटकळींना वेग आला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार आयुक्तपदासाठी झालाच तर के. एल. प्रसाद, मीरा बोरवणकर आणि के. के. पाठक यांचा विचार होऊ शकतो. तर सह-आयुक्त पदासाठी धनंजय कमलाकर किंवा देवेन भारती यांचा विचार होऊ शकतो. सरकारची इच्छा काहीही असली, तरी विद्यमान महासंचालक संजीव दयाळ याच पदावर राहतील. त्यांचा दर्जा आणि पगार यामुळे त्यांना अन्यत्र हलविणे किंवा त्यांच्या जागी अन्य कोणाला आणणे शक्य नाही. दयाळ यांचा सध्याचा पगार राज्याच्या पोलीस सेवेतील सर्वोच्च-कमाल श्रेणीत आहे. नियमानुसार या श्रेणीत एकच अधिकारी असू शकतो. त्यामुळे दयाळ यांच्या जागी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करावयाची झाल्यास राज्य मंत्रिमंडळाला या श्रेणीतील आणखी एक पद निर्माण करण्याच्या सुधारणेला मंजुरी द्यावी लागेल.