४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 06:27 IST2025-08-20T06:27:16+5:302025-08-20T06:27:33+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या

Investment of Rs 42,892 crores, creation of 25,892 jobs; 10 investment MoUs signed | ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात ४२,८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक व २५,८९२  रोजगारांची निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मंत्रालयात झालेल्या या करारांवेळी  मुख्य सचिव राजेशुमार, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, तसेच गुंतवणूकदार उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सामंजस्य करार
कंपनी     कार्यक्षेत्र     गुंतवणूक     रोजगार
​​​​​​​

  • ज्युपिटर इंटरनॅशनल लि.     सोलर पॅनेल निर्मिती     १०,९०० कोटी     ८,३०८  
  • रोचक सिस्टिम्स प्रा.लि.     डेटा सेंटर     २,५०८ कोटी     १,००० 
  • रोव्हिसन टेक हब प्रा.लि.     डेटा सेंटर     २,५६४  कोटी     १,१००  
  • वॉव आयर्न ॲण्ड स्टिल  प्रा.लि.     पोलाद उद्योग     ४,३०० कोटी     १,५०० 
  • वेबमिंट डिजिटल प्रा.लि.     डेटा सेंटर     ४,८४६  कोटी     २,०५०  
  • ॲटलास्ट कॉपको     औद्योगिक उपकरणे     ५७५ कोटी     ३,४००  
  • एलएनके ग्रीन एनर्जी     हरित ऊर्जा     ४,७०० कोटी     २,५०० 
  • प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि.    डेटा सेंटर, लॉजिस्टिक सेंटर, रिअल इस्टेट    १२,५०० कोटी     ८,७००


हायपरलूप प्रकल्पालाही गती

मुख्यमंत्री म्हणाले की, गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे. आयआयटी मुंबई व आयआयटी मद्रास यांच्यामुळे हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळाली आहे. हा प्रकल्प लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यात नव्हे, तर संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवेल.

युके, युरोपमधील गुंतवणूक आणणार

ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर तर्फे महाराष्ट्रात युके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सहकार्य करण्याचा सामंजस्य करार आणि टीयूटीआर हायपरलूम प्रा.लि. कंपनीकडून जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

Web Title: Investment of Rs 42,892 crores, creation of 25,892 jobs; 10 investment MoUs signed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.