आधी कोण विरोधात गेले याची चौकशी करा, भरत गोगावले यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:30 IST2025-01-24T06:30:12+5:302025-01-24T06:30:40+5:30
Sunil Tatkare Vs Bharat Gogawale: माझ्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर अनेक निराधार आरोप झाले. त्यांचे पुढे राजकारणात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला होता. यावर भरत गोगावले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आधी कोण विरोधात गेले याची चौकशी करा, भरत गोगावले यांची मागणी
अलिबाग - माझ्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर अनेक निराधार आरोप झाले. त्यांचे पुढे राजकारणात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी अलिबागमध्ये सोमवारी पत्रकार परिषदेत शिंदेसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला होता. यावर राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले असून, आधी कोण विरोधात गेले, याची चौकशी करा, असे गुरुवारी आव्हान दिले.
बाळासाहेबांचे सैनिक
आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. लोकसभा निवडणुकीत तन, मन आणि धनाने त्यांचे काम केले. मात्र, विधानसभेला आमचे काम केले नाही.
हिंमत असेल तर त्यांनी बल्लाळेश्वरचरणी छातीवर हात ठेवून सांगावे की, त्यांनी आम्हाला पाडण्याचे काम केले नाही, असेही ते म्हणाले.
पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना व अजित पवार गटात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गोगावले रोहा येथे आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.