शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

International Yoga Day 2018 : युवतींनी जलतरण तलावात केली वैविध्यपूर्ण आसने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:10 AM

ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करून योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला.

पुणे : ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करून योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहील आणि निरोगी समाजनिर्मिती होईल, असे सांगत पुण्यातील तब्बल १०० शालेय विद्यार्थ्यांनीदेखील तलावाबाहेर ही आसने घालून जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला.श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टिट्यूट आॅफ योगा पुणे संस्थेतील युवतींनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील नांदे तलावात योगासनांचे सादरीकरण केले. या वेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, विनय मराठे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, मानसी देशपांडे, अ‍ॅड. मिलिंद पवार, आनंद रेखी, आयोजक प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर, मनीषा खेडेकर, योगाचार्य विदुला शेंडे, विश्वास शेंडे, संगीता लकारे उपस्थित होते.पुण्यातील १०० शालेय विद्यार्थ्यांनी देखील आसने घालून या वेळी योगदिन साजरा केला. केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी फोनद्वारे उपस्थितांशी संवाद साधून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकिका माळगे, मनीषा कडिर्ले या युवतींनी पाण्यामध्ये योगासने सादर केली. प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, ‘ताणतणाव आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योग करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थिदशेपासूनच योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगासने करावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पाण्यामध्ये आसने करणे अवघड असते, हा प्रकार परदेशात प्रचलित आहे. पुण्यामध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला.>डोक्यापासून ते पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला योगासनांमुळे व्यायाम मिळतो. पाण्यामध्ये केलेला अ‍ॅक्वा योगा हा वेगळ्या प्रकारचा व्यायामप्रकार आहे. पाण्यातील लहरींशी झुंज देत ही योगासने केली जात असल्याने शरीराला अधिक व्यायाम मिळतो.- विदुला शेंडे, योगाचार्य>श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टिट्यूट आॅफ योगा पुणे संस्थेतील युवतींनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील नांदे तलावात योगासनांचे सादरीकरण केले. या वेळी (डावीकडून) चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकिका माळगे, मनीषा कडिर्ले.

टॅग्स :Yogaयोग