शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातींच्या मुलांसाठी लवकरच आंतरराष्ट्रीय शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 04:56 IST

Education News : अनुसूचित जातींच्या मुलामुलींसाठी राज्याच्या सहा विभागात सहा आंतरराष्ट्रीय शाळा उभारण्याचा सामाजिक न्याय विभागाचा प्रस्ताव

मुंबई : अनुसूचित जातींच्या मुलामुलींसाठी राज्याच्या सहा विभागात सहा आंतरराष्ट्रीय शाळा उभारण्याचा सामाजिक न्याय विभागाचा प्रस्ताव असून पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील काही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. मात्र, नव्या सरकारने ती योजनाच गुंडाळली. आता सामाजिक न्याय विभागाने आंतरराष्ट्रीय शाळा उघडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.पूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये चंद्रकांत हांडोरे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना त्यांनी अनुसूचित जातींच्या मुलांसाठी १०० निवासी शाळा बांधल्या. त्यांचा परिसर भव्य होता, मुलांच्या निवासाचीही व्यवस्था त्या ठिकाणी होती. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा त्या मागील उद्देश होता. मात्र, पुढे त्या शाळा अन्य शाळांप्रमाणेच सुरू राहिल्या. तेथे शिक्षकही मानधनावर नेमले जाऊ लागले. शाळांच्या इमारती भव्य होत्या पण अत्यंत दर्जेदार शिक्षण देण्याचा उद्देश सफल होऊ शकला नाही.आता प्रत्येक महसूल विभागात एक या प्रमाणे आंतरराष्ट्रीय शाळा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देशातील नामवंत बोर्डाची संलग्नता घेऊन तेथील अभ्यासक्रम शाळांमध्ये राबविला जाईल. येथे शिक्षण मोफत असेल. हे करत असताना शालेय शिक्षण विभागाचे सहकार्य घेतले जाईल.

डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेतील कामे रद्दडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये दरवर्षी कामे केली जातात. यंदा कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिकट असल्याने प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कार्यादेश न दिलेली कामे रद्द करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. ही कामे जवळपास ५०० कोटी रुपयांची आहेत. गेल्या काही वर्षांत या योजनेत तीन हजार कोटी रुपयांवर खर्च झाला पण त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने अलीकडेच दिले होते. आता कोरोनाच्या आर्थिक संकटाचे कारण देत विभागाने योजनेतील कामे रद्द केली आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार