शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

मद्यनिर्मितीतील ‘फाइल’राजला अटकाव; मद्यार्क कोटा प्रक्रिया झाली सोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 5:31 AM

किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया सुलभ होणार

- नारायण जाधवठाणे : कोरोनामुळे सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने आयातीत विदेशी मद्यावरील करात ५० टक्के कपात केल्यानंतर राज्यातील मद्य कंपन्यांनाही शुल्क भरून पाहिजे तेवढे उत्पादन करू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकार आणि आयुक्तांकडे अर्ज, विनंत्या, प्रस्तावांचे कागदी घोडे नाचवून ही मंजुरी घ्यावी लागत हाेती. त्याला आता लगाम बसून किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया सुलभ होणार असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क  आयुक्त कांतीलाल उमप यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गेल्या आठवड्यात घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील मद्य कंपन्यांना आता त्यांना ठरवून दिलेल्या मद्यार्काच्या मंजूर कोट्याव्यतिरिक्त वाढीव कोटा हवा असेल तर तो त्यांना शुल्क भरून वाढवून मिळणार असून, कंपन्या गरज भासेल तेवढी मद्यनिर्मिती करू शकणार आहेत.कोरोनामुळे राज्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच विदेशी मद्यावर असलेला ३०० टक्के कर राज्य सरकारने ५० टक्के कमी करून १५० टक्के केला. यामुळे आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून राज्य सरकारच्या महसुलात २०० ते २५० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. यानंतर मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या ९ डिसेंबर २०२१च्या विनंतीवरून गृहविभागाने राज्यातील देशी-विदेशी मद्य निर्मात्यांना मद्यनिर्मितीसाठी शासनाच्या पूर्वमान्यतेने मद्यार्क कोटा मंजूर करून घेण्याची पद्धतच आता व्यवसाय सुलभतेनुसार रद्द केली आहे. राज्य सरकारच्या महसुलात वाढ होणारआता मद्य निर्मात्यांना मद्यनिर्मितीसाठी वित्तीय वर्षाच्या सुरुवातीला परवाना घेताना अनुज्ञप्ती शुल्काच्या प्रमाणात पाहिजे तेवढा कोटा मंजूर करून घेता येणार आहे. याशिवाय पुढेही हवा असेल तेव्हा तो वाढवून घेता येणार आहे. यामुळे मद्य निर्मात्यांचा त्रास कमी होणार असून, राज्य शासनाच्या महसुलातही मोठी वाढ होईल, असा विश्वास हा निर्णय घेताना व्यक्त करण्यात आला आहे.यापूर्वी मद्य निर्मात्या कंपन्यांचा मद्यार्क कोटा शिल्लक राहत असेल तर तो पुढच्या वर्षात आपोआप वर्ग होत होता; परंतु तो वाढवून हवा असेल तर पुन्हा अर्ज, विनंत्या, प्रस्तावांची कसरत आयुक्त कार्यालय ते मंत्रालयांपर्यंत करावी लागत होती. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती; परंतु आता नव्या निर्णयानुसार ती सुलभ झाली आहे. मद्यनिर्मिती कंपन्या  वित्तीय वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना हवा तेवढा कोटा शुल्क भरून घेऊ शकणार आहेत. तसेच तो वाढवून हवा असेल तर पुन्हा आयुक्त कार्यालय, मंत्रालयापर्यंत अर्ज, प्रस्ताव करण्याची त्यांना गरज भासणार नाही.- कांतीलाल उमप,उत्पादन शुल्क आयुक्त, महाराष्ट्रया शासन निर्णयामुळे मद्य निर्मात्यांना मद्यार्क कोटा कमी पडल्यास यापुढे उत्पादन करण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मद्य उत्पादन होऊन शासनाच्या महसुलातदेखील वाढ होईल.- नीलेश सांगडे, अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे