शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 17:25 IST

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

ठळक मुद्दे'द इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलच्या काही प्रश्न विचारण्यात आले.

मुंबई : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 'द इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले.

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेने झेंडा बदलला. तर या भेटीमागे काही रहस्य होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज ठाकरे यांना आपण जवळून ओळखता. कुणाच्या म्हणण्याने ते काही करतील असे नाही. राज ठाकरे यांना त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कुठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरुन काढायची हे समजते. ते कुणाच्या सांगण्यावरुन काही करतील असे वाटत नाही."

याचबरोबर, शिवसेना मोठी कधी झाली? शिवसेनेने मराठी माणसासोबत हिंदुत्वाची कास धरली, तेव्हा राष्ट्रीय पक्ष झाला. त्यानंतर राज ठाकरेंच्याही लक्षात आले की मराठी माणूस हा केंद्रबिंदू असलाच पाहिजे, पण त्याला व्यापकता दिली नाही तर, आपली भूमिका मर्यादित राहते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज ठाकरे हे माझे मित्र आहेत, मीडियाला न समजता आम्ही अनेकवेळा बोललो आहे, भेटलो आहे. मी मुख्यमंत्री असतानाही त्यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारायला मजा येते. त्यांच्याकडे वेगळी माहिती, वेगळे नॉलेज असते. मी त्यांच्यावर खूप टीका केली आहे, त्यांनी माझ्यावर केली आहे."

राज ठाकरे यांच्याकडे एक वेगळा विचार आहे, त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक पद्धत आहे. माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून समजून घेतले की नेमके त्यांच्या मनात काय आहे, त्यांचा ट्रॅक करेक्ट होता, ते योग्य दिशेने होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ज्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. तेव्हाच त्यांनी भगवा झेंडा ठरवला होता, मात्र काही कारणांनी आधीचा झेंडा आणला. पण, भगवा आधीच रजिस्टर करुन घेतला होता. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला आहे, असेही देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे