शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

विमा रुग्णालयाचा डोलारा २६ परिचारिकांवर

By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST

सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी ५५ परिचारिकांची गरज असताना बंधपत्रित परिचारिकांसह केवळ २६ परिचारिकांच्या खाद्यांवर रुग्णसेवा आहे.

सोयींअभावी रुग्णसेवा प्रभावित : विविध संवर्गातील ६० टक्के पदे रिक्त नागपूर : सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी ५५ परिचारिकांची गरज असताना बंधपत्रित परिचारिकांसह केवळ २६ परिचारिकांच्या खाद्यांवर रुग्णसेवा आहे. परिणामी रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. या रुग्णालयात सध्या कायमस्वरूपी १४, तर बंधपत्रित १२ परिचारिका कार्यरत आहेत. या बंधपत्रित परिचारिकांचा करार जानेवारी २०१५ मध्ये संपत आहे. या १२ जागा कायमस्वरूपी न भरल्यास रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या या रुग्णालयात सोयींचा अभाव आहे. रुग्णालयातील डॉक्टर सोडल्यास विविध संवर्गातील ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णालयातील सहा वॉर्डाचे चार वॉर्डात रूपांतर करण्यात आले. मुनष्यबळाची तोकडी संख्या व सोयींच्या अभावाने गुंतागुंतीच्या प्रसूतीच्या शस्त्रक्रियांपासून ते आकस्मिक गंभीर आजाराच्या रुग्णांना मेडिकलकडे पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक समस्यांशी तोंड देत असलेले हे रुग्णालय आता परिचारिकांच्या तोकड्या संख्याबळामुळे अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, बंधपत्रित परिचारिकांना दोन वर्षाच्या मुदतीत काम करण्याचा नियम असताना या परिचारिकांना एकाच वर्षाची मुदत देण्यात आली आहे. त्यातही येत्या जानेवारी महिन्यात ही मुदत संपत असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. डिजिटल एक्स-रे मशीनची प्रतीक्षारुग्णालयाच्या अस्थिरोग विभागात दिवसाकाठी ४० ते ५० रुग्णांचे ‘एक्स-रे’ काढले जातात. मात्र विमा रुग्णालयात सध्या हे एकमेव यंत्र आहे. पण, या यंत्राची मुदतही संपली आहे. मागील तीन वर्षांपासून नवीन एक्स-रे यंत्रासाठी आयुक्त, राज्य कामगार विमा महामंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. महामंडळाने हा प्रस्ताव पारित करून तो मंजुरीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवला होता. त्याला यापूर्वीच्या आघाडी शासनाने मंजुरी प्रदान केली होती. साधारण २४ लाखांची ही मशीन येणार आहे, असे सर्वच म्हणत असले तरी ती लागणार कधी यावर सर्वच मौन धारण करून आहेत. (प्रतिनिधी)सीआर मशीनची गरजविमा रुग्णालयात अस्थिरोग विभागात आता महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. यामुळे या विभागात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्याच्या स्थितीत रोज शंभरावर रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, हाडाच्या फ्रॅक्चरचे त्वरित निदान करणारे ‘सीआर’ मशीन उपलब्ध नसल्याने डॉक्टरांना तत्काळ निर्णय घेण्यास अडचण जाते. पॅथालॉजी विभाग तीन वर्षांपासून बंदरुग्णालयातील पॅथालॉजी विभागातील तंत्रज्ञ व सहायकाची सर्वच पदे रिक्त आहेत. यामुळे हा विभाग तीन वर्षांपासून बंद आहे. रुग्णाच्या विविध चाचण्याची जबाबदारी एका खासगी पॅथालॉजीला देण्यात आली आहे. रुग्णालयाला महिन्याकाठी दोन-तीन लाख रुपये मोजावे लागत आहे.सहापैकी चार वॉर्डच सुरूरुग्णालयात एकूण सहा वॉर्ड आहेत. त्यातील दोन वॉर्ड बंद पडले आहेत. प्रसुती, अस्थिरोग व मेडिसीन (औषध) एवढेच वॉर्ड सुरू आहेत. रुग्णालयात अत्याधुनिक टेबलाची अत्यंत आवश्यकता आहे. हा प्रस्तावही तीन वर्षांपूर्वीच पाठविण्यात आला. परंतु, त्याला अद्याप मान्यताच मिळाली नाही.