Instructions to name Vilasrao Deshmukh on 'Eastern Free Way'; | 'इस्टर्न फ्री वे'ला देणार विलासराव देशमुखांचे नाव; रितेश देशमुखने मानले अजितदादांचे आभार
'इस्टर्न फ्री वे'ला देणार विलासराव देशमुखांचे नाव; रितेश देशमुखने मानले अजितदादांचे आभार

मुंबई - बहुचर्चित समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यानंतर मुंबईतील 'इस्टर्न फ्रि वे'ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानंतर अभिनेता रितेश देशमुख याने अजित पवार यांचे आभार मानले आहे. 

मुख्यमंत्रीपदी असताना विलासराव देशमुख यांनी मुंबईच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. तसेच इस्टर्न फ्रि वेला अर्थात पूर्व द्रुतगती मार्गाच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. त्यामुळे या मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याच्या सूचना अजित पवार यांनी बैठकीत केल्या. 

या संदर्भात अजित पवारांनी ट्विट करत माहिती दिली. अजित पवार यांनी ट्विट करताच अभिनेता रितेश देशमुखने त्यांचे आभार मानले आहे. श्री. विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला. त्याबद्दल मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन

या बैठकीला वित्त आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Instructions to name Vilasrao Deshmukh on 'Eastern Free Way';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.