"राज्‍यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात", सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 07:44 PM2022-08-14T19:44:50+5:302022-08-14T19:45:38+5:30

Sudhir Mungantiwar: मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

"Instead of hello, 'Vande Mataram' will start conversation in government offices in the state", announced Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar. | "राज्‍यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात", सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

"राज्‍यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात", सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

googlenewsNext

चंद्रपुर -  हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापूढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

वंदे मातरम् हे आपले  राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसुन भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत.

१८०० साली टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सांस्‍कृतिक कार्या विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Web Title: "Instead of hello, 'Vande Mataram' will start conversation in government offices in the state", announced Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.