शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

फटाक्यांच्या आवाजाची पाहणी करा

By admin | Updated: October 17, 2014 00:20 IST

दिवाळीचे वेध लागते तसे फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाची ही चाहूल लागतेच. यंदा या ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्याची शक्यता हरित न्यायाधिकरणामुळे निर्माण झाली आहे.

पुणो : दिवाळीचे वेध लागते तसे फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाची ही चाहूल लागतेच. यंदा या ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्याची शक्यता हरित न्यायाधिकरणामुळे निर्माण झाली आहे. फटाके विक्री करणारी दुकाने, फटाक्यांचा व्यापार करणा:या कंपन्यांना, उत्पादकांच्या गोदामांना अचानक भेटी देण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिका:यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय फटाके विरोधी समिती स्थापन करण्याचे आदेश राष्ट्रिय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत. या समित्यांना चायना मेड फटके आढळल्यास किंवा चायानमेड फटाक्यांचा साठी दिसल्यास ते तातडीने जप्त करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
राष्ट्रिय हरित न्यायाधिकरणचे न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले. भारतामध्ये फटाके उडविण्यावर बंदी आणावी यासंदर्भात पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. रविन्द्र भुसारी यांनी अॅड असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. फटाक्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण; बालमजुरी, अपघात, मानवी शरिराचे विकृतीकरण याबाबत न्यायाधिकरणासमोर मांडण्यात आले. याविरोधात कायद्याची अंमलबजावणी करणा:या यंत्रणा कोणतेही परिणामकारक पाऊल उचलताना दिसत नाही असा आरोप याचिकेतून केला आहे. 
याबाबत न्यायाधिकरणाने आदेशात सांगितले की,  समितीने सुतळी बॉम्ब, सेव्हन शॉट बॉम्ब किंवा अतिआवाज करारे फटाके यांच्यामुळे होणा:या ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप समितीने करावेव अशा फटाक्यांचा, चायनामेड फटाक्यांचा साठी पंचनामा करून जप्त करावा, यासंदर्भातील कारवाई ज्वालाग्राही वस्तू विभागाने करावी. 
 
कोण आहे या समितीत?
महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी, ज्वालाग्राही वस्तू विभागाचे प्रमुख, स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस हवालदार.
विजयी उमेदवारांसाठी.
निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी आपला आनंदोत्सव पर्यावरणहित लक्षात ठेवून साजरा करावा. आता आपल्या विजयाचे दिखावू प्रदर्शन मांडण्याची पद्धत बंद होणो ही काळाची गरज आहे. आपण सभ्य, सुशिक्षित समाजाचे घटक आहोत याची जाणिव होणो आवश्यक आहे. समाजाकडून निवडून दिलेल्या व्यक्तिंनी याबाबत योग्य संदेश समजून घेण्याची गरज आहे.